गुप्तधनासाठी पोटच्या मुलीचा नरबळीचा प्रयत्न
पूजापाठ दरम्यान मुलीचा वडील हा सतत वाल्मिक नावाच्या मांत्रिकाशी बोलत होता. त्यावेळी त्याला गुप्तधनासाठी नरबळी द्यावा लागेल असे सांगण्यात आले. तेव्हा तो मोठ्या मुलीचा नरबळी देण्यासाठी तयार झाला. हा सर्व प्रकार मोठी मुलगी लपून पाहत होती. तिला संशय आल्याने तीने आपल्या मोबाईलमध्ये गुप्तधनासाठी खोदलेल्या खड्डयाचा फोटो काढून आपल्या यवतमाळ येथील मित्राला पाठविला. त्यासोबत 'माझा गुप्तधनासाठी बळी जाण्याची शक्यता आहे, मला वाचव'असा संदेश पाठवला.
त्या मित्राने यवतमाळ येथील आपल्या पोलीस मित्राला माहिती दिली. त्यावरून ताबडतोब हालचाली करून बाभुळगाव पोलीस आणि यवतमाळ पोलिसांनी संयुक्तरित्या मादणी येथे घटनास्थळी धाड टाकली. यातील सर्व नऊ जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. मुलीने दिलेल्या तक्रारीववरून पोलिसांनी वडिलांसह आठ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी मादणी येथे गुप्तधनासाठी सुरू असलेला प्रकार उधळून लावला. यावेळी खड्डा खोदण्याचे साहित्य जसे कुदळ, फावडे, टिकास, टोपले, पूजेचे साहित्य, चाकू, सुरी आदी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र जेधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, सागर बेलसरे, आषिश अवजाडे करत आहे.
मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचा वडील तिच्यावर अल्पवयीन असल्यापासून शारिरीक संबंध ठेवायचा. ती बाहेरगावी शिकत असल्याने सुटीमध्ये घरी आल्यानंतर तिच्यावर अत्याचार करीत होता. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आई सतत आजारी असल्याने त्याचा फायदा वडील उचलत होता. यातून घरात नेहमी वादविवाद व्हायचे. त्यामुळेच वडिलाने मुलीचा नरबळी देण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीपुढे त्याचे काहीच चालले नाही. मुलीच्या सतर्कतेमुळे हा घाणेरडा प्रकार उजेडात आला.
पोक्सोसह जादुटोणा प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
नराधम वडिलावर भादंविच्या कलम 376 (2)(एन) यासह इतर आठ जणांवर कलम 354, 307, 323,506, 34, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 4,6,10 तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 4 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment