नवी दिल्ली;
देशातील कोरोना रुग्णसंख्येत (COVID-19) पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,९२७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २,२५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात १६,२७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशात लागोपाठ पाचव्या दिवशी २ हजारांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी दिवसभरात २ हजार ४८३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आसाम तसेच केरळने जुन्या कोरोनामृत्यूची माहिती अद्ययावत केल्याने सोमवारी १ हजार ३९९ कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली होती. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १ हजार ९७० रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५५ टक्के नोंदवण्यात आला होता.
सोमवारी दिवसभरात आसामने १ हजार ३४७ तर केरळने ४७ जुन्या कोरोनामृत्यूची माहिती अद्यायावत केली असली तरी दिवसभरात या राज्यात एकही कोरोनामृत्यूची नोंद घेण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.
देशात कोरोनाविरोधात (COVID-19) सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८८ कोटी १९ लाख ४० हजार ९७१ डोस देण्यात आले आहेत. यातील २.७० कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत १९२ कोटी ८५ लाख ९० हजार ११५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील १९ कोटी ९० लाख ९८ हजार ८६० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
COVID-19 | India reports 2,927 fresh cases and 2,252 recoveries, in the last 24 hours. Active cases 16,279
— ANI (@ANI) April 27, 2022
Daily positivity rate (0.58%) pic.twitter.com/bUGouzeoSX
No comments:
Post a Comment