जलसंपदाचे मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक जयंत गवळी यांनी घेतला विविध कामांचा आढावा
खरीपहंगाम पूर्व कामांचा आढावा घेवून संबंधीतांना केल्या सूचना
लातूर (प्रतिनिधी) : मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक जयंत जी. गवळी (लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग, कडा भवन, औरगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयात सिंचन आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीत लातूर_उस्मानाबाद अंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघु, साठवण तसेच उच्च पातळी बंधारा तथा कोपब बाबतची उन्हाळी हंगामाची विस्तृत टिप्पणीसह, खरीपहंगाम पूर्व आढावा सादर करण्यात आला.
यावेळी अधीक्षक अभियंता व प्रशासक अभिजीत म्हेत्रे (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर) यांनी मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक जयंत जी. गवळी यांचा सत्कार व स्वागत केले. तसेच लातूर उस्मानाबाद जिल्हाची सविस्तर माहिती देवून आगामी येणाऱ्या सिंचन वर्षाची व जिल्यातील प्रकल्पांच्या सर्व कामाची PPT द्वारे सादरी करण करण्यात आले.
लातूर ग्रामीण मधील सध्या प्रगती पथावरील प्रकल्पांच्या नुतनीकरण व आधुनिकरण करण्यात येणार असलेल्या तावरजा मध्यम प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामाची, तेरणा मध्यम प्रकल्पाची व मांजरा प्रकल्पाच्या ड्रीप 2 अंतर्गत कामाची प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर दौरा करून पाहणी करण्यात आली. व याबाबतीत त्वरित कार्यवाही करण्यासाठी सर्व सबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना जयंत जी. गवळी यांनी सूचना केल्या.
यावेळी लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता व उपअभियंता हजर होते.
No comments:
Post a Comment