लातूर विशाल सहकारी सोसायटीवर विक्रांत गोजमगुंडे बिनविरोध - latur saptrang

Breaking

Saturday, April 2, 2022

लातूर विशाल सहकारी सोसायटीवर विक्रांत गोजमगुंडे बिनविरोध



 लातूर विशाल सहकारी सोसायटीवर विक्रांत गोजमगुंडे बिनविरोध


   लातूर/प्रतिनिधी:लातूर विशाल सहकारी सोसायटीच्या संचालकपदी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.लातूर शहर व सभोवतालच्या बोरवटी, खोपेगाव,खुलगापुर, वासनगाव,वरवंटी,सिकंदरपुर, खाडगाव आदी १२ गावांची मिळून लातूर विशाल सहकारी सोसायटी तयार करण्यात आलेली आहे.या सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे.
  अर्ज भरण्याची मुदत संपलेली असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल आहे.माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात लोकनेते विलासरावजी देशमुख सहकार पॅनलकडून कर्जदार गटातून विक्रम गोजमगुंडे, बाजार समितीचे माजी उपसभापती रावसाहेब लकडे,पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ मोरे,बाजार समितीचे माजी सभापती लालासाहेब देशमुख,विकास कारखान्याचे संचालक गोविंद डुरे पाटील, सत्यनारायण पाटील,विकास सुळ,नागनाथ खोबरे,
सूर्यकांत धायगुडे,दगडू भारती,विष्णू खंदाडे,हणमंत पवार,दत्तात्रय आर्वीकर, आशा जगन्नाथ सुरवसे पाटील,समता राम थोरमोटे पाटील,फुलचंद धडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.६ एप्रिल रोजी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
 विक्रांत गोजमगुंडे यांनी अर्ज दाखल केलेल्या गटातून त्यांचा एकमेव अर्ज आल्याने आल्याने या जागेवरील निवड बिनविरोध झाली आहे.या निवडीबद्दल विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment