उद्योजकांनी व्यवसायाला नैतिक मूल्यांची जोड द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Thursday, April 21, 2022

उद्योजकांनी व्यवसायाला नैतिक मूल्यांची जोड द्यावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 21 :- उद्योजकांनी व्यापारव्यवसाय व उद्योग करताना केवळ अधिक नफा हे उद्दिष्ट न ठेवता व्यवसायाला नैतिक व शाश्वत मूल्यांची जोड द्यावी तसेच देश व समाजाप्रती आपली बांधिलकी जपावीअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

विविध क्षेत्रातील नवउद्योजकांना राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) मुंबई येथेसाई बिझनेस क्लब गाला‘ पुरस्कार प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

यावेळी साई बिझनेस क्लबच्या संस्थापिका डॉ कृती वजीरसदस्य ऋत्विज म्हस्केडॉ दलिप कुमारडॉ एच एस रावतजयेश जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज जग भारताकडे मोठ्या आशेने व अपेक्षेने पाहत आहे. अश्यावेळी आपण सिद्धांत घेऊन व जीवन मूल्ये सांभाळून व्यवसायात वाटचाल केली तर नफा व आनंद दोन्ही प्राप्त होतील. नवउद्योगात महिला मोठ्या प्रमाणात येत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राज्यपालांच्या हस्तेइंडियाना – द कल्चरल बिझ या उद्योग व संस्कृतींना जोडणाऱ्या संकल्पनेची सुरुवात करण्यात आली.

कोरोनाच्या ऐन मध्यावर केवळ आठ उद्योजकांच्या सहकार्याने साई बिझनेस क्लबची स्थापना झाली असून आज 100 पेक्षा अधिक व्यावसायिक व उद्योजक क्लबशी जोडले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

राज्यपालांच्या हस्ते डॉ. दलिप कुमारडॉ. हिना विजय ओझाडॉ. समीर नन्नावरेआचार्य सोनाली लोटलीकर व रोहन लोटलीकरडॉ. दीपक राऊतशशांक जोशीडॉ. नागेंद्र दीक्षितवास्तू तज्ज्ञ कल्पेशसिंह चौहानविजय जिनवालातस्नीम मोर्कसडॉ. कलाश्री बर्वेडॉ. मंगेश बर्वेसचिन गायकवाडडॉ.अतुल डाकरेडॉ. अलोक खोब्रागडेऋत्विज म्हस्केपियुष पंडितएच एस रावतप्रिया श्रीमनकरजयेश जोशी आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/19dsYIi
https://ift.tt/5V09iJy

No comments:

Post a Comment