पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा जनक्षोभास सामोरे जावे लागेल - शैलेश गोजमगुंडे - latur saptrang

Breaking

Thursday, April 21, 2022

पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा जनक्षोभास सामोरे जावे लागेल - शैलेश गोजमगुंडे



 लातूर - गेल्या आठवड्यापासून लातूर शहरात दुषीत पाणी पुरवठा होत आहे. शिवाय पाणी नियमीत वेळेवर येत नाही. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने पाणी पुरवठा विभागाच्या प्रभारी उपायुक्त मयुरा शिंदेकर यांची भेट घेतली.

          सध्याचा कडक उन्हाळा आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत होत असलेल्या पाणी पुरवठ्यातील प्रशासनाच्या हयगयीमुळे नागरीकांच्या जीवितास हानी पोचु शकते. शिवाय महानगरपालिकेच्या वतीने लातूरला केला जाणारा पाणीपुरवठा आधीच ८ दिवसाला होतो. मात्र सद्यस्थितीत काही भागात तो १२ ते १४ दिवसांनी होत आहे.
     ही स्थिती येत्या २ दिवसात बदलली नाही तर शहरातील जनतेचा जनक्षोभ उसळेल.  त्याला सर्वस्वी मनपा प्रशासनच जबाबदार असेल.  असे लेखी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रशासनास सांगितले आहे.  या शिष्टमंडळात गटनेते शैलेश गोजमगुंडे यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, अॅड. दिपक मठपती, मंगेश बिराजदार, अजीत पाटील कव्हेकर, शैलेश स्वामी, सुनील मलवाड, संगीत रंदाळे, रागिणी यादव, देवा साळुंके, शोभाताई पाटील, शितल मालु आदींचा समावेश होता.

No comments:

Post a Comment