हिंगोली जिल्ह्यासाठी 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर - latur saptrang

Breaking

Thursday, April 21, 2022

हिंगोली जिल्ह्यासाठी 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर



 हिंगोली जिल्ह्यासाठी 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर


 


हिंगोली (जिमाका),  : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे एप्रिल, मे व जून-2022 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  627 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  


तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-162 क्विंटल, औंढा ना.-90 क्विंटल, सेनगाव-105 क्विंटल, कळमनुरी-150 क्विंटल, वसमत-120 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment