तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख - latur saptrang

Breaking

Friday, April 29, 2022

तलाव ठेक्याची रक्कम भरण्यास मे अखेरपर्यंत मुदतवाढ – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख

मुंबई, दि. २९ :  कोरोना प्रादुर्भाव काळात आर्थिक झळ सहन कराव्या लागलेल्या राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव, जलाशयांची  वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच २०२१-२२  तलाव ठेक्याची रक्कम माफ करण्याचा  प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळी  राज्यात घोषित टाळेबंदीमुळे राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना पूर्ण क्षमतेनुसार मासेमारी करता आली नाही, तसेच उत्पादित मासळीची विक्री करण्यास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे मच्छिमारांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्यातील मासेमारीकरिता ठेक्याने देण्यात आलेल्या तलाव आणि जलाशयांची चालू वर्ष सन २०२१-२२ ची वार्षिक तलाव ठेका रक्कम भरणा करण्यासाठी  ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मंत्री श्री. शेख यांनी सांगितले.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ZeKdUwP
https://ift.tt/ljwhCd5

No comments:

Post a Comment