मुरुड शहरातील महात्मा बसवेश्वर महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
मुरुड / प्रतिनिधी ÷अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री.बसलिंग सिध्दलिंग खडके तर उपाध्यक्षपदी श्री. दिपक वैजनाथ मुंदाळे आणि सचिव पदी विरभद्र बाबुराव स्वामी यांची निवड करण्यात आली आहे विरशैव लिंगायत समाज मंदिर येथे महात्मा बसवेश्वर महाराज प्रेमी तसेच सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पारपडली. यावेळी जयंती उत्सव समिती कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे
मुरुड येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची सार्वजनिक जयंती मोठ्या धूमधडाक्याने उत्साही आनंदी वातावरणात साजरी करण्यात येते परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना काळामुळे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती छोटेखानी मोजक्या नागरिकांच्या उपस्थित साजरी करण्यात आली होती. सध्या देशासह राज्यात कोरोना आजार आटोक्यात आल्याने राज्य शासनाने कोरोना निर्बंध शितील केले आहेत. त्यामुळे ह्या वर्षी मुरुडमधील महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती पूर्वीसारखी ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांचीत धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे
जयंती संदर्भांत बैठक पार पडली सदरील बैठकीमध्ये श्री.खुदासे सर,पप्पु कोरे, महेश लखदिवे, संतोष काळे, वैजनाथ भुजबळ, भैय्या क्षीरसागर,शिवराज खडके, वैजनाथ खडके, सतिष कुमठेकर, शिवलिंग चौधरी,उमेश कुंभार, आत्मलिंग पटणे, शिंगणापूरे सर, प्रसाद काळे, दत्ता खडके, नागनाथ खडके, कैलास स्वामी, पिंन्टू इगंळे , धनजंय काळे, महात्मा बसवेश्वर प्रेमी,समाज बांधव, प्रतिष्ठित नागरिक,व्यापारी तसेच तरुणांचा सहभाग होता.
No comments:
Post a Comment