महिला सक्षमीकरणामध्ये लातूर महानगरपालिकेची उत्तुंग भरारी – महापौर विक्रांत गोजमगुंडे - latur saptrang

Breaking

Friday, April 15, 2022

महिला सक्षमीकरणामध्ये लातूर महानगरपालिकेची उत्तुंग भरारी – महापौर विक्रांत गोजमगुंडे



 महिला सक्षमीकरणामध्ये लातूर महानगरपालिकेची  

उत्तुंग भरारी  – महापौर विक्रांत गोजमगुंडे

लातूर –
 पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील नागरिकांना शासनाच्या योजने अंतर्गत विविध घटकांतर्गत लाभ देण्यात आलेला आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून महिला बचत गट, वस्ती स्तर संघ. शहर स्तर संघ. वैयक्तिक कर्ज, समूह कर्ज , बचत गटांना कर्ज, नागरी बेघर निवारा, फेरीवाले यांना सहाय करण्यात येत आहे. लातूर शहरामधील विविध भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होण्याच्या दर्ष्टीने व महिलांना केंद्रबिंदू मानून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे  यांनी दिली
या अभियानाच्या माध्यमातून लातूर शहरात किमान १० महिलांचा एक बचत गट असे एकूण १११० महिलांचे बचत गट तयार करण्यात आलेले असून त्यात सुमारे १२५०० महिला सहभागी आहेत. बचत गटाची स्थापना झालेपासून ३ महिने पूर्ण झालेल्या बचत गटांना १००००/- रु प्रती गट बिनव्याजी फिरता निधी दिला जातो यात मनपाने जवळपास एकूण ८०० बचत गटांना रुपये ८०.०० लक्ष फिरता निधी वितरीत केलेला आहे.  किमान १० बचत गट मिळून वस्ती स्तर संघाची स्थापना केली जाते लातूर शहरामध्ये असे एकूण ४६ वस्ती स्तर संघ तयार करण्यात आलेले आहेत व शहरामधील स्थापन केलेल्या सर्व वस्ती स्तर संघाचे मिळून दोन शहर स्तर संघ तयार करण्यात आलेले आहेत या वस्ती स्तर संघ व शहर स्तर संघ यांची  नोंदणी  मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे केले जाते. स्थापित झालेल्या वस्ती स्तर संघाना किमान सहा  महिने पूर्ण झाल्यानंतर रु ५००००/- प्रती वस्ती स्तर संघ बिनव्याजी फिरता निधी दिला जातो यात मनपाने एकूण ४२ वस्ती स्तर संघांना रुपये २१.०० लक्ष  फिरता निधी वितरीत केलेला आहे.
 वैयक्तिक कर्ज घटकामध्ये जवळपास ७०२ लाभार्थ्यांना बँकेकडून वार्षिक ७% व्याज दराने एकूण रु. ७ कोटी १५ लक्ष ५१ हजार कर्ज  मिळवून दिलेले आहे. पण  प्रामुख्याने ४० नागरिकांना ऑटो रिक्षा मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळाला असून हे विशेष नोंद घेण्याजोगे आहे.  तर सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये २८१ महिला बचत गटांना सहा कोटी त्रेसष्ट लक्ष कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. या कर्ज वाटपामध्ये लातूर महानगरपालिका ही राज्यातील महानगरपालिकामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 
त्याचप्रमाणे शहरातील २९०० फेरीवाले  यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यापैकी १७०० फेरीवाले यांना  स्मार्ट ओळखपत्र व व्यावसायिक प्रमाणपत्र देणारी राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. तसेच पी एम स्वानिधी योजने अंतर्गत २८८१ फेरीवाले यांना प्रति फेरीवाले यांना रु.१००००/- एकूण रुपये दोन कोटी ८८ लक्ष कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. या कर्ज वाटपामध्ये लातूर महानगरपालिका ही राज्यातील महानगरपालिकामध्ये ३ रा क्रमांक आहे. 
 त्याचप्रमाणे शहरातील जे बेघर जसे की, बसस्थानक , रेल्वे स्टेशन , मंदिरे, उंच इमारत , पूल , रस्त्याच्या कडेला आसरा घेऊन राहणारे अशा अनाथ , अपंग, वृद्ध महिला, पुरुष व बालके यांचेसाठी १०० व्यक्ती राहतील अशा नागरी बेघर निवाऱ्याचा बांधकाम प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.  
               सदर अभियानाचा लाभ शहरातील दारिद्रय रेषेखालील गरीब नागरिकांना योग्य रीतीने व्हावा यासाठी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत असे महापौर विक्रांत गोजमगुंडे  यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment