भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही - latur saptrang

Breaking

Monday, April 25, 2022

भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही

 


भोंग्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकत नाही

भोंगा प्रकरणी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर धोरण जाहीर करावे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केली आहे. भोंग्यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री वळसे- पाटील यांनी ही माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीला भाजपचे प्रतिनिधी हजर नव्हते. 

राज्य सरकार भोंग्याबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. ज्यांच्याकडून भोंग्यांचा वापर केला जात आहे त्यांनीच आता यावर विचार करायला हवा, असे वळसे-पाटील यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० दरम्यान भोंगे वापरण्यास परवानगी आहे. पण रात्री १० ते सकाळी ६ या दरम्यान भोंगे वापरण्यासाठी बंदी असल्याचे दिलीप वळसे- पाटील यांनी नमूद केले.

कोणत्याही एक पक्षासाठी नियम बदलू शकत नाही : आदित्य ठाकरे

No comments:

Post a Comment