Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच! परवानगी नाही मिळाली तर काय? उत्तर दानवेंनी दिलं! - latur saptrang

Breaking

Tuesday, April 26, 2022

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाहीच! परवानगी नाही मिळाली तर काय? उत्तर दानवेंनी दिलं!

 



औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचं आयोजन 1 मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आलं आहे. मनसेकडून (MNS) या सभेसाठी परवानगी मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्यापही या सभेला परवानगी मिळालेली नाही. राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागून आठ दिवस उलटले आहेत. मात्र आता महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेसाठी फक्त सहा दिवसांचा कालावधी बाकी राहिला आहे. मात्र सभेला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे आता नेमकं काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे. औरंगाबादमध्ये नियोजित ठिकाणीच ही सभा व्हावी, या मागणीवर मनसे ठाम आहे. तर दुसरीकडे सभेला परवानगी मिळाली नाही, तर काय? असाही प्रश्न उपस्थइत केला जातो आहे. या प्रश्नाचं उत्तर मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलंय.

काय म्हणाले दानवे?

पोलीस परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेणारच, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी देत नसल्याच्या प्रश्नावर राव साहेब दानवे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी त्यांनी हे उत्तर दिलंय. परवानगी नाही दिली तरी राज ठाकरे सभा घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय.

पोलिसांचं काय म्हणणंय?

दरम्यान, पोलिसांनी मनसेच्या नियोजित सभा रमजान ईननंतर घेतली जावी, असा सल्ला मनसैनिकांना दिला आहे. नियोजित ठिकाणी सभा घ्यायची असेल, तर सभेची तारीख बदलली जावी, असं पोलिसांचं म्हणणंय. तर दुसरीकडे मनसे मात्र नियोजित ठिकाणीच सभा व्हावी, यासाठी कामाला लागली आहे. आता परवानगी मुद्द्यावरुन औरंगाबादचं राजकारण तापलंय

3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलाय. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सभेत जे भाषण करतील, त्यानंतर वातावरण आणखी तापेल, अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळेही राज ठाकरेंच्या 1 मे रोजी आयोजित केलेल्या सभेला परवानगी अद्यापतरी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र दिनी औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरेंची सभा व्हावी, यासाठी मनसेचे पदाधिकारी आग्रही आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली होती. औरंगाबादमध्येही अनेक राजकीय संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला विरोध केला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत मुस्लिम नुमाइंदा कौंसिल, वंचित बहुजन आघाडी, मौलाना आझाद विचार मंच, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अ‍ॅक्शन संघटना आदींनी पोलीस आयुक्तांना यासाठीचे निवेदन दिले आहे

No comments:

Post a Comment