सकाळच्या टॉप घडामोडी : 23 मे 2022 - latur saptrang

Breaking

Monday, May 23, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 23 मे 2022

 🎯 सकाळच्या टॉप घडामोडी : 23 मे 2022


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ राज्य सरकारचा जनतेला दिलासा: पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट'मध्ये कपात, पेट्रोल 2.08, तर डिझेल 1.44 रुपयांनी स्वस्त



▪️ शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कारखाने सुरु राहणार


▪️ पंतप्रधान मोदी 14 जूनला महाराष्ट्रात: देहूत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे करणार लोकार्पण, संस्थानच्या विश्वस्तांची माहिती


▪️ औरंगाबादेतील तरुणीचा मारेकरी जेरबंद: आरोपी शरणसिंग सेठीला 24 तासांत बेड्या, नाशिकच्या लासलगावातून आवळल्या मुसक्या


▪️ पुण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप: अयोध्या दौऱ्यात मनसैनिकांना अडकवण्यासाठी वातावरण पेटवले, अन्यथा युपीच्या एका खासदाराची हिंमत काय?


▪️ राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरस्कृत उमेदवार होऊ शकतात ; संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली भेट 


▪️ आता सांगली शहर बनणार 'यलो सिटी'; महापालिकेच्या अनेक इमारती, अन्य शासकीय कार्यालये आणि प्रमुख मार्गावरील आणि दर्शनी असणाऱ्या इमारती पिवळ्या रंगाने उजळणार 


▪️ सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात; यात डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या मुलासह सहाजणांचा मृत्यू


▪️ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी, तर इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठीही संघाची घोषणा


▪️ आयपीएल 2022 च्या शेवटच्या लीग सामन्यात, पंजाबचा विजय: SRH 5 विकेट्सने पराभूत, लिव्हिंगस्टोनने एक तुफानी खेळी खेळली; 22 चेंडूत 49 धावा


No comments:

Post a Comment