तहसीलदार रेणापूर यांची विभागीय चौकशी करा निळकंठेश्वर चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - latur saptrang

Breaking

Thursday, May 19, 2022

तहसीलदार रेणापूर यांची विभागीय चौकशी करा निळकंठेश्वर चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 तहसीलदार रेणापूर यांची विभागीय चौकशी करा निळकंठेश्वर चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लोक सेवकास पाठीशी घालून उचित कारवाई न केल्यामुळे  तहसिलदार रेणापूर यांची विभागीय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईची संचिका देण्याच्या मागणीचे निवेदन निळकंठेश्वर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या कडे लेखी तक्रारी द्वारे केले आहे. 
लेखी तक्रारीत म्हटले आहे की, चव्हाण यांनी दि.12 मे रोजी तहसीलदार यांना अभिलेख कक्षातील अभिलेखापाल कोरे व्हि. के. यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लुट थांबवुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात लेखी तक्रारी अर्ज दिला होता. कारण कोरे व्हि. के. आणि कार्यालयातील बडे नामक व्यक्ती  तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून जुनी कागदपत्रे ७/१२, फेरफार नक्कल साठी प्रत्येकी १३० ते १५० रुपये, खासरा पाहणी नकल, जनगणना नक्कल साठी १५० ते २०० रुपये तर एन. ए. नक्कलेसाठी मनाला वाटेल ती रक्कम घेण्यात येत आहे. सदरील पैसे घेतल्याची कोणतीही पावती देण्यात येत नाही.चव्हाण यांना एन.ए.ची नक्कल काढण्यासाठी १३ पेजसाठी ७०० रुपये व कार्यालयीन बडे नामक व्यक्तीने ४०० रुपये असे एकूण ११००  रुपये घेतलेले आहेत. फक्त ७०० रुपयाची पावती देण्यात आलेली आहे. सदरील ७०० रुपये शुल्क हे नियम बाह्य पणे अतिरिक्त घेण्यात आलेले असुन कोणत्याही कायद्यात बसत नाहीत. अशा पद्धतीने अभिलेखपाल कोरे व्हि. के. आणि कार्यालयातील बडे नामक व्यक्ती हे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करीत आहेत. अभिलेखपाल कोरे व्ही. के. हे पैसे घेतल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर सही करीत नाही. त्यामुळे अभिलेखपाल कोरे व्हि. के आणि कार्यालयीन कर्मचारी बडे नामक व्यक्ती यांच्यावर ती कारवाई करणे गरजेचे आहे .सदरील अभिलेखपाल कोरे व्हि. के. यांच्यावरती कारवाई करण्याची लेखी तक्रार देऊन आज दि. १९ मे रोजी ३९ दिवस झाले तरीही आजतागायत अशा गंभीर प्रकरणाची मा.तहसीलदार साहेबांनी चव्हाण यांच्या शंकेची किंवा अर्जाची दखल घेतलेली नसल्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करून केलेल्या कारवाईची संचिका देण्याची मागणी चव्हाण यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्या कडे लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment