दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
🔥 घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ :
वाढत्या महागाईमुळे सर्वसामन्य नागरीक बेजार झाले आहेत. आता पुन्हा एकदा घरगुती सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरानुसार सिलेंडरच्या किंमती 1 हजार रुपयाच्या पुढे गेल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे.
💁♂️ औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद :
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय पुरात्त्व विभागाने घेतला आहे. 12 मे रोजी तेलंगाणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलिल यांनी 12 मे रोजी खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. तसेच अनेक जण तीव्र प्रतिक्रिया देत असल्याने कबर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
😎 झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी आंदोलन :
आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जनतेच्या प्रश्नावर जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथेच अण्णा हजारेंविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे. झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
🚨 राज कुंद्राविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल :
पॉर्नोग्राफीप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पॉर्न रॅकेट प्रकरणात कुंद्राविरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💍 अभिनेत्री हृता दुर्गुळे प्रतीक शाहसोबत अडकली लग्नाच्या बेडीत :
‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे अखेर लग्नाच्या बेडीत अडकली. बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत तिने सप्तपदी घेतल्या. सध्या तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थित थाटात दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
No comments:
Post a Comment