पितृत्वाला काळीमा फासणार्या बापाला दहा वर्ष सक्तमजुुरीची शिक्षा
लातूर -प्रकरणातील थोडकयात हकीकत अशी की,पीडीत बालिकेचे आई वडील हे भिक्षुकी म्हणुन त्यांच्या कुटुंबाची गुजराण करत होते. पीडीतेेची आई आंबेजोगाई येथे भिक्षा मागते तर वडील लातूूर येथे भिक्षा मागायचे. पीडीतेची आई गुरूवार आणि शुक्रवार या दिवशी आंबेजोगाई येथे भिक्षा मागण्यासाठी जात होती आणि तेथेच मुक्काम करून परत येत असे. पीडीतेच्या आईच्या गैरहजेरी मध्ये वडील हे पीडितेला स्वताचे अंग दाबण्यासाठी जवळ बोलावुन घेत असत. माहे मे 2020 मध्ये असेच पीडिता आरोपी वडिलांचे हात पाय दाबत असता आरोपी वडिलांनी पीडीतेवर लैगिक अत्याचार करण्यास सुरूवात केली. पीडितेने सदर प्रकाराला विरोध केला असता आरोपी बापाने पीडितेचर जबरदस्ती लैगिक अत्याचर केला आणि सदर बाब कोणालाही न सांगण्याबाबत धमकी दिली. बापाच्या धमकीमुळे पिडीतेने सदर घटना कोणालाही सांगण्याचे धाडस केले नाही. पण त्यामुळै आरोपी बापाने पीडीतेवर माहे मे 2020 पासून मे 2021 पर्यंत सतत लैगिक अत्याचार चालु ठेवले.मे 2021 मध्ये जेंव्हा पिडीतेला पोटामध्ये खुपच दुखत होते तेव्हा पीडीतेवर झालेल्या अत्याचाराची बाब समोर आली आणि पिडीताही आरोपी पासुन गर्भवती असल्याचे लक्षात आले. पीडितेच्या आईने पिडीतेला विश्वासात घेतल्यावर पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रसंग आईला सांगितला. पीडितेच्या आईने हा गंभीर प्रकार पोलीस स्टेशन रेणापूर येथे कथन केल्यानंतर आरोपी बापा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.सदरील गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती क्रांती निर्मळे यांनी अत्यंत गाभीर्याने करून आरोपी विरूध्द माननीय विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.पिडीतेचा वयाबाबत पुरावा उपलब्ध नसल्यामुळै तपासा दरम्यान पिडीताही बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेेमध्येे बालक या व्याख्येमध्ये आणण्यासाठी तपासी अधिकार्यांनी पीडीतेची रेडिओलॉजिकल टेस्ट करून घेऊन ती अठरा वर्ष वयापेक्षा कमी असल्याबाबत डॉक्टरांकडून वैदयकीय अभिप्राय घेतलेला होता.विशेष पोेक्सो न्यायालय लातूर येथे आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्याकरिता सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील मंगेश एस महिंद्रकर यांनी विविध कागदोपत्री पुराव्या सोबतच 9 साक्षीदारांच्या जबाबी नोंंदविलेल्या आहेत.पिडितेचे वय सिध्द करण्याकरिता आणि तिच्यावर लैगिक अत्याचार झाल्याबाबत सरकार पक्षातर्फे एकुण चार वैदयकीय अधिकार्यांच्या जबान्या नोेंदविण्यात आल्या आणि काही अहवाल, अभिप्राय त्यांच्याकडुन सिध्दही करून घेण्यात आलेे.यात अंत्यत दुर्देवाची बाब म्हणजे पीडित ही तिच्या वडीलापासुनच गर्भवती होती आणि तिने बाळालाही काही काळानंतर जन्म दिला. तपासी अधिकार्यांनी गांभीर्याने आरोपी,पीडित आणि नवजात बालकांची डीएन चाचणी करून घेऊन बाळ हे आरोपीचेच असल्याबाबत अभिप्राय घेतलेला होता आणि अभिप्राय देणार्या डॉक्टरांची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली.या पुराव्या सोबतच पीडीतेची स्वताची साक्ष आणि घटनेची मााहिती पोलीस स्टेशनला देणारी तिची आई हिचीही साक्ष महत्वाची ठरली .या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे पोेलीस महासंचालक यांनी पूर्ण राज्यामध्ये काही प्रकरणे लवकरात लवकर निर्गती करण्यासाठी एक मोहिम राबवुन प्रत्येक जिल्हयातुुन एक एक प्रकरण न्यायालयाल विनंती करून सुनावणी करीता घेण्याबाबत विनंती केली होती. आणि विशेष न्यायालय लातूर यांनी पोेलीस अधिक्षक लातूर यांच्या विनंतीवरून सदरील प्रकरण तातडीची सुनावणी करिता पटलावर घेतले होते. या प्रकरणात अॅॅड.विदया वीर, अॅड.सोमेश्वर बिराजदार,अॅड.महादेवी गवळी पोलीस हेड कॉन्सटेबल श्रीमती जाधव यांनी मौलाचे सहकार्य केले.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
No comments:
Post a Comment