🎯 एटीएम मशीनमधून विना डेबिट किंवा क्रेडिट कार्डने काढा पैसे!
💁♂️ आता तुम्ही एटीएम मशीनमधून विना डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पैसे काढू शकता. जर तुमच्याकडे कार्ड नसेल तर अशा परिस्थितीत याचा वापर करता येऊ शकतो.
👍 या सेवेचा वापर करण्यासाठी एटीएम मशीन युपीआय सर्व्हिस अनेबल्ड असणं आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्हाला पैसे काढता येऊ शकणार नाही.
😎 याशिवाय तुमच्या मोबाइलवर युपीआय बेस्ड Gpay, PhonePe, Amazon Pay, Paytm यापैकी कोणतंही एक अॅप असणं अनिवार्य आहे.
👩💻 या फीचरचा वापर करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असणंही आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला एटीएममध्ये जाऊन विथड्राव्हल कॅश हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल.
✨ त्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रिनवर युपीआयचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. यानंतर तुम्हाला एटीएनच्या स्क्रिनवर एक क्युआर कोड दिसेल.
👀 क्युआर कोड दिसल्यानंतर युपीआय बेस्ड अॅपमध्ये जाऊन क्युआर कोड स्कॅन करा. तसंच जितकी अमाऊंट तुम्हाला काढायची असेल ती टाका.
💫 सध्या याचं लिमिट 5 हजार रुपये ठेवण्यात आलं आहे. तुमचा क्युआर कोड स्कॅन झाल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा आणि युपीआय पिन टाका. तुम्हाला तुम्ही टाकलेली रक्कम मिळेल.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
No comments:
Post a Comment