*डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठला नीचांकी दर* :
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. मंगळवारी चलन बाजारात भारतीय रुपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी घसरून 77.73 रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आला आहे. रुपयाच्या दरात होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. रुपयाची सुरू असलेली घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक डॉलरची विक्री करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
🚨 *कार्ती चिदंबरम यांच्या 7 मालमत्तांवर CBI कडून छापेमारी* :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरमयांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे. मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडूमधल्या सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 2010 ते 2014 कालावधीत पैशांची बेकायदेशीर मार्गानं देवाणघेवाण केल्याच्या आरोपप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित प्रकरणातून सीबीआयनं पी. चिदंबरम यांच्या सात मालमत्तांवर छापे टाकले आहेत
😎 *...आणि आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले!* :
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघात झाला असून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर कार आणि एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.
🗣️ *'औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय अजेंड्यावर नाही'* :
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही असं वक्तव्य आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो.
💥 *धुळ्यात भीषण अपघात: तिघांचा मृत्यू* :
धुळे जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर मित्रनगर येथे हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, मध्यरात्री महामार्गावरच 3 गाड्या एकमेकांना विचित्र पद्धतीने धडकल्याने हा अपघात झाला. यात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj
No comments:
Post a Comment