मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन - latur saptrang

Breaking

Saturday, May 28, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते प्रतिभावान साहित्यिक, परखड वक्ते आणि उत्कृष्ट असे संघटक होते.  उच्चविद्याविभूषित स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात रान उठवले. त्यांचे विज्ञानवादी विचार आणि प्रखर राष्ट्रभक्ती आजही प्रेरणादायी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.”

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/NpO5h7Q
https://ift.tt/fSsD9V1

No comments:

Post a Comment