ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पातळीवर जागृती निर्माण होणे आवश्यक- समता परिषद धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांचे साक्री तालुका आढावा बैठकीत प्रतिपादन - latur saptrang

Breaking

Saturday, May 28, 2022

ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पातळीवर जागृती निर्माण होणे आवश्यक- समता परिषद धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांचे साक्री तालुका आढावा बैठकीत प्रतिपादन



 ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पातळीवर जागृती निर्माण होणे आवश्यक-

समता परिषद धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांचे साक्री तालुका आढावा बैठकीत प्रतिपादन

(जैताणे)-ओबीसीना राजकीय आरक्षण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थगित करण्यात आलेले आहे.या स्थगितीने स्था.स्व.संस्थांमध्ये  ओ.बी.सी.प्रतिनिधित्व संपल्यात जमा आहे.त्या आरक्षणामुळे वर्षानुवर्षे राजकीय जाणिवांपासून वंचित असणाऱ्या ओबीसी समाजाला संधी मिळत होती.यासाठी आरक्षण अबाधित राहणे आवश्यक आहे.समाजाच्या प्रत्येक स्तरातून यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत .मा.ना.छगनरावजी भुजबळ यासाठी सर्वोतोपरी झटत आहेत.असे प्रतिपादन समता परिषद जिल्हाध्यक्ष राजेशजी बागुल यांनी साक्री येथे आयोजित साक्री तालुका पदाधिकारी निवड आढावा बैठकीत केले.

   सदर बैठक साक्री येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेश बागुल होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक रविंद्र सुर्यवंशी यांनी केले.साक्री तालुका नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष मोहन सुर्यवंशी यांनीही यावेळीं मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन मनोज भागवत यांनी केले.

  बैठकीनंतर उपस्थित समता सैनिकांच्या इच्छुक पदाधिकारी मुलाखती घेण्यात आल्या.

     बैठकीस चेतन खैरनार,गणेश देवरे,वना जाधव,रवींद्र खैरनार,(माळी),जगदीश जाधव,अॅड.नंदकिशोर सुर्यवंशी, अमोल जाधव,तुकाराम खलाने,भिला कोळेकर,नाना कोळेकर,सुभाष कोळेकर,कांतीलाल माळी,दिलीप माळी, अमोल अहिरे,दगाजी गांगुर्डे ,अमोल अहिरे,दगाजी गांगुर्डे ,आदींसह तालुक्यातून समता सैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment