दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
❗ सावधान! उद्या पेट्रोल पंपचालकांचा संप... :
फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने विविध मागण्यांसाठी 31 मे रोजी पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील 19 राज्यांत हे आंदोलन करण्यात येणार असून, उद्या खासगी पेट्रोल पंप कोरडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरबदलाच्या चुकीच्या धोरणांमुळे आम्हाला अनेकदा मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते, असे पंप चालकांचे म्हणणे आहे.
😎 आधार कार्ड झेरॉक्स न देण्याचा 'तो' सल्ला मागे! :
सर्वसामान्यांनी त्यांच्या आधारची झेरॉक्स कोणासोबतही शेअर करू नका, असा दिलेला सल्ला सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने तत्काळ मागे घेतला आहे. यावरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे आधारची झेरॉक्स कुणालाही शेअर करू नका, असा सल्ला देणारे निवेदन मागे घेण्यात आले आहे.
✈️ नेपाळच्या विमान अपघातात 22 जणांचा मृत्यू :
4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. आता या अपघातग्रस्तविमानाचे फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबानमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे तुकडे झाले. दरम्यान, रेस्क्यू टीम आणि नेपाळी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
🎯 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात :
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नागपुरात झालेल्या बैठकीत आगामी 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 96 वे महामंडळाच्या स्थळ निवड समितीने वर्ध्याला भेट दिली, तिथली मैदान आणि वाहन तळची पाहणी केली. ती योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी शिफारस केली. त्यानुसार साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
💥 औरंगाबादच्या डॉक्टर दाम्पत्याचा उत्तराखंडमध्ये अपघात :
औरंगाबादमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ अलका एकबोटे यांचे अपघातात निधन झाले आहे. त्या बजाज रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आणि क्लिनिकल व मोलिक्युलार जेनेटिक्स प्रमुख म्हणून काम करत होत्या. उत्तराखंडमध्ये गंगोत्रीजवळील त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या गाडीत डॉ. अलका एकबोटे यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. व्यंकटेश एकबोटे देखील होते. ते सुद्धा जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
No comments:
Post a Comment