मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती - latur saptrang

Breaking

Sunday, May 29, 2022

मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती


 

मुंबई : आजच्या दिवसातील सर्वांसाठी सकारात्मक बातमी म्हणजे मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. केरळमधील ६० टक्के पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मान्सून १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला होता. हवामान विभागानं यंदा मान्सून वेळे अगोदर केरळमध्ये दाखल होईल, असं म्हटलं होतं. त्याप्रमाणं मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. त्या अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रात ७ ते ८ जूनपर्यंत दाखल होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आम्ही कुणालाही विसरलो नाही, योग्यवेळी दखल घेतो, अजित पवारांचं ओवेसींना प्रत्युत्तर
यंदा वरुणाराजा वेळेआधी दाखल झाला आहे. हा वेग कायम राहिल्यास पुढील सात दिवसात महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. ७ ते ८ जून पर्यंत मान्सून मुंबई किंवा पुण्यात दाखल होऊ शकतो.

महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यास उशीर लागणार?
भारतीय हवामान विभागानं आज केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. केरळमधये आज मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे मान्सूचा वेग कमी राहू शकतो, असं देखील हवामान विभागानं सांगितलं आहे. मात्र, मान्सनचा वेग कायम राहिल्यास मान्सून तळकोकणात ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचू शकतो. तर, मुंबई आणि पुण्यात मान्सून ७ ते ८ जूनपर्यंत पोहोचू शकतो.

के.एस.होसाळीकर यांचं ट्विट

हवामान विभागाचे अधिकारी के.एस. होसाळीकर यांनी देखील केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची दिली आहे. मान्सून केरळमधील कन्नूर, पल्लकड आणि मदूराईमध्ये दाखल झाल्याचं म्हटलं आहे. त्या ठिकाणी पाऊस सुरु आहे.
लक्ष्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला? अशोक सराफ स्पष्टच बोलले
मान्सून अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झाला होता. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दुसरीकडे मान्सून भारतात दाखल होत असताना शेतकऱ्यांकडून देखील खरिपपूर्व कामांना वेग देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment