गॅस सिलिंडर जास्त दिवस चालण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!
सध्या काटकसर करणे ही काळाची गरज बनलीय. कारण महागाई वाढतच चालली आहे. गॅसचे हजार रुपयांवर येऊन ठेपले आहेत. असे असली तरी गॅस ही गरज असल्याने सर्वांनाच गॅस वापरणे आवश्यक ठरते. म्हणून एक सिलेंडर जास्तीत-जास्त दिवस जाण्यासाठी नक्की काय करावे? याच्या काही उपयुक्त टिप्स आपण या लेखात जाणून घेणार आहोत…
1. गॅस घेताना तो व्यवस्थित भरलेला आहे की नाही? हे तपासा. त्यामुळे गॅस आल्यावर त्याचे वजन करा.
2. नवा गॅस घेता तेव्हा त्याची तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवा. म्हणजे गॅस संपल्यावर तो किती दिवस गेला? हे लक्षात येईल.
3. गॅसवर काम करताना गॅस फ्लेम नेहमी कमी ठेवा. तसेच हे फ्लेम सतत चेक करत रहा. जर फलेम निळी असेल तर ठीक आहे पण पिवळी असेल तर मग गॅस आणि बर्नर व्हिनेगरने स्वच्छ करा.नवीन सिम कार्ड घेताय? मग अगोदर बदलले नियम समजून घ्या!
4. रेग्युलेटर जवळ गॅस लीक तर होत नाही ना? ते पहा. लीक असेल तर वेळीच दुरुस्त करून घ्या.
5. स्वयंपाक करताना नेहमी स्वच्छ आणि कोरडी भांडी गॅसवर ठेवा. कारण ओली भांडी कोरडी होण्यासाठी जास्त गॅस घालवतात.
6. स्वयंपाकाची पूर्वतयारी करूनच गॅस चालू करा. म्हणजे भाज्या चिरण्यात, धुण्यात किंवा मसाला करण्यात वेळ असेल आणि तरीही गॅस चालू ठेवून तुम्ही हे वरील सर्व करत असाल तर गॅस खूप जास्त लागेल.
7. भाजी शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा. म्हणजे कमीत-कमी वेळेत भाजी शिजेल
10. सगळं काम झाल्यावर गॅस स्वच्छ करून ठेवा. तसेच रेग्यूलेटर बंद करायला विसरू नका.
11. अन्न शिजवताना प्रेशर कुकरचा वापर करा म्हणजे गॅस वाचेल.
12. ओव्हन, मायक्रोव्हेव, इलेक्ट्रिक केटल यांचा वापर करा म्हणजे गॅसवर लोड येणार नाही. पर्यायाने गॅसची देखील बचत होईल.
13. रोज सगळ्यांनी एकत्र मिळून जेवण करा. म्हणजे प्रत्येकाचे अन्न गरम करण्यासाठी लागणारा गॅस वाचेल.
अशा प्रकारे आपण किचनच्या सवईमध्ये थोडे बदल केले आणि काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर आपल्या गॅसची बचत होईल…
No comments:
Post a Comment