जलजीवन मिशन अंतर्गत सोनगाव ते धानोरे पाणी पुरवठा योजनेसाठी २० कोटी ३६ लाख मंजूर
देवळाली प्रवरा (शेख इब्राहिम)
राहुरी मतदार संघातील जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत सोनगांव-धानोरे पाणीपुरवठा योजना साठी २० कोटी ३६ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे रु. २० कोटी ३६ लाख ६२ हजार रुपये खर्च येणार आहे. या योजनेला १६ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण समितीने तांत्रिक मान्यता दिली होती. सोनगांव धानोरे गावांकरीता वरदान ठरणा-या या पाणी योजनेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने सोनगाव –धानोरे तसेच वाड्या वस्त्त्यावरील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असुन या गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रीया होवुन काम सुरु होईल.
सोनगांव – धानोरे पाणी पुरवठा योजनेसाठी राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन तसेच मंत्रालयात बैठका घेवुन हा प्रश्न मार्गी लागला आहे. आता पर्यंत मतदारसंघात आपल्या पाठपुराव्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी मिळणालेला असुन उर्वरीत काही प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच प्रस्तावीत योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांची लवकरच निविदा प्रक्रिया होवुन पुढील कामांना सुरवात होईल. या नवीन पाणीयोजनेमुळे सोनगांव धानोरे परीसरातील ग्रामस्थांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानुन धन्यवाद दिले आहे.

No comments:
Post a Comment