दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोड - latur saptrang

Breaking

Sunday, May 29, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोड

 📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk  







 🌧️ अखेर मान्सून केरळमध्ये दाखल : हवामान विभाग


अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.  मान्सून काही काळ श्रीलंकेच्या वेशीवर अडकला होता मात्र, अखेर तो आज केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

 


🗣️ 'राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांना मिळणार प्रत्येकी 50 कोटी'


राज्य शासनाने पुढील तीन वर्षासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्रत्येकी 50 कोटी असे एकूण 600 कोटी रुपये देण्याचे नियोजन केले आहे. या माध्यमातून संशोधनाला चालना मिळणार असल्याचे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केलं. शेतकऱ्यांना लागणारं बियाणं आणि खतांचं नियोजन करण्यात आलं आहे.


🚔  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन


मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर मोठय़ा संख्येने वेगमर्यादेचे पालन होत नाही. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी रावेत, किवळी उड्डाणपूल ते खंडाळा, अमृतांजन पूल हद्दीतील 3 लाख 60 हजार 954 वाहनचालकांविरोधात जानेवारी ते डिसेंबर 2021 मध्ये कारवाई केली आहे. 2022 मध्येही असेच चित्र असून चार महिन्यांत 48 हजार 763 वाहनचालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याकडून 10 कोटी 21लाख 12हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला.


🔥 ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग


 अंबिका नगर 2, वागळे इस्टेट, ठाणे (प.) या ठिकाणी रोड नंबर 29 मध्ये प्लॉट नंबर ए-202 सिलिका सायंटिफिक (मालक: अक्षय कदम) या प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याचा कंपनीमध्ये आग लागली आहे. वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे रात्री उशीरापर्यंत कळू शकले नव्हते.


😎 नेपाळमध्ये 19 प्रवाशांसह विमान बेपत्ता


नेपाळमध्ये एका प्रवाशी विमानाचा संपर्क तुटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या विमानामध्ये 19 प्रवासी होते. त्यापैकी चार भारतीयांचा समावेश असल्याची माहिती आहे. आज सकाळी विमानाचा ग्राउंड सपोर्टसोबत संपर्क तुटला असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. 'तारा एअर' कंपनीचे हे विमान होते.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

No comments:

Post a Comment