दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Tuesday, May 17, 2022

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 17 : मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षणसंस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतकृषि वित्त महामंडळाचे अध्यक्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ चारुदत्त मायीकुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटीलकुलसचिव डॉ दिनेश भोंडेपरीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

ज्ञानदान प्रक्रियेचा वेदकाळापासून आढावा घेताना आगामी काळात मुक्त विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा देखील लाभ घ्यावाअसे आवाहन राज्यपालांनी केले. मुक्त विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.       

 

छत्रपती शिवाजी महाराजशाहू महाराज यांच्या नावाने अध्यासन केंद्रे सुरु करावी : उदय सामंत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापनेपासून ५० ते ६० लाख पदवी प्रदान करण्यात आल्या असल्याचे सांगून मुक्त विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता इंदोरगोवाहैद्राबाददुबई यांसह मराठी लोक जेथे आहेत तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मुक्त विद्यापीठाने त्यांच्या नावांचे अध्यासन सुरु करावीत अशी सूचना मंत्री श्री. सामंत यांनी केली.  दीक्षांत समारंभात १७६११३ स्नातकांना पदवीपदविकापदव्युत्तर पदवी व  पीएच डी प्रदान करण्यात आल्या.

००००

Governor presides over 27th Convocation of Open University

 

Governor of Maharashtra and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari presided over the 27th Annual Convocation of the Yashwantrao Chavan Maharashtra Open University through online mode. Degrees, Post Graduate degrees, Diplomas and Ph.Ds were conferred on 176113 graduating students.

Minister of Higher and Technical Education Uday Samant, Chairman of Agricultural Finance Corporation and former Vice Chancellor of the Vasantrao Naik Marathwada Agricultural University Dr Charudatt Mayee, Vice Chancellor Dr Prashantkumar Patil, Registrar  Dr Dinesh Bhonde and Controller of Examinations Bhatuprasad Patil were prominent among those present.

000

नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj




from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/RSFQ632
https://ift.tt/LGV5dNe

No comments:

Post a Comment