मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विशेष मुलाखतीचे पुन:प्रसारण होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर बुधवार दि. 18 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र हा नेहमीच प्रागतिक विचारांचा राहिला आहे. विशेषतः महिलांचे हक्क, त्यांचे शिक्षण आणि सुरक्षा या बाबतीत राज्याने वेळोवेळी घेतलेले निर्णय देशासाठी पथदर्शी ठरले आहेत. महिला सुरक्षा आणि समाजात त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी राज्य महिला आयोग कार्यरत आहे. या आयोगाचे कार्य, आतापर्यंतची वाटचाल आणि आव्हाने याविषयी सविस्तर माहिती रूपाली चाकणकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
०००
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/4uCI5E3
https://ift.tt/0RfLM2b
No comments:
Post a Comment