LIC चे शेअर विकावे की होल्ड करावे? तज्ज्ञांना सल्ला काय? वाचा! - latur saptrang

Breaking

Wednesday, May 18, 2022

LIC चे शेअर विकावे की होल्ड करावे? तज्ज्ञांना सल्ला काय? वाचा!

 

LIC


LIC चे शेअर विकावे की होल्ड करावे? तज्ज्ञांना सल्ला काय? वाचा!



अखेर बहुचर्चित LIC चा शेअर शेअर बाजारात लिस्ट झालाय. मात्र कंपनीचे शेअर त्यांच्या ऑफर प्राईस बँडवरून 9 टक्क्यांच्या सवलतीने लिस्ट झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबद्दल निशंक होण्यासाठी हा लेख नक्की वाचा..

एलआयसीने 4 मे रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आयपीओ लाँच केला. कंपनीच्या शेअर्सची किंमत 949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली. आज मंगळवारी NSE वर 9 टक्के सवलतीच्या दराने म्हणजेच 865 रुपयांवर शेअर्सचा व्यवहार सुरू झाला. म्हणजेच गुंतवणूकदारांचे प्रति शेअर सुमारे 84 रुपयांचे नुकसान झाले.

गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे? एलआयसीचे शेअर बाजारात सवलतीच्या दरात लिस्ट झाले असले तरी, कंपनीचे मूल्यांकन आणि स्थिरता आकर्षक आहे. त्यामुळे येत्या काळात किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार दोघेही यामध्ये गुंतवणूक करतील. परदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीनेही एलआयसीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.


येत्या काही दिवसांत एलआयसीच्या शेअर्सची किंमत 1000 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या घाबरून शेअर्स विकण्याची गरज नाही. एलआयसीचे शेअर्स बाजारातील दोन्ही एक्सचेंजेसवर लिस्ट झाले. NSE वर त्याची लिस्टिंग 8.11 टक्के म्हणजेच 77 रुपयांच्या तोट्यात झाली आणि किंमत 872 रुपये निश्चित करण्यात आली. LIC चे शेअर्स BSE वर 867 रुपयांच्या किमतीत लिस्ट झाले, जे सुमारे 9 टक्के तोटा दर्शवते. यापूर्वी गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स 949 रुपयांच्या वरच्या बँडने खरेदी केले होते.

पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांचे किती नुकसान झाले? कंपनीने किरकोळ गुंतवणूकदार आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत दिली होती, तर एलआयसीच्या पॉलिसीधारकांना प्रति शेअर 60 रुपयांची सूट दिली होती. यानुसार आज लिस्ट केल्यानंतर या श्रेणीतील गुंतवणूकदारांचे नुकसानही कमी झाले. पॉलिसीधारकांना प्रति शेअर केवळ 24 रुपयांचा तोटा, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 39 रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

LIC IPO प्रत्येक विभाग ओव्हरसबस्क्राईब सरकारी कंपनी असल्याने, विमा क्षेत्रातील मोठा हिस्सा आणि मजबूत ब्रँडिंगमुळे एलआयसीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचा खूप विश्वास होता. हेच कारण आहे की 4 ते 9 मे या कालावधीत आयपीओच्या बोलीमध्ये 2.95 पट सबस्क्रिप्शन घेतली. म्हणजेच, बाजारात आलेल्या 16.2 कोटी शेअर्सच्या तुलनेत 47.77 कोटी शेअर्ससाठी बोली लागली. मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी लांब राहणंच पसंत केल्याचं सध्याचं चित्र आहे.


नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj


No comments:

Post a Comment