विचार देण्यासाठी संगीतासारखे उत्तम माध्यम नाही - डॉ. कुकडे काका.
लातूर : विचार देण्यासाठी संगीतासारखे दुसरे उत्तम माध्यम नाही, असे प्रतिपादन पद मभूषण डॉ. कुकडे काका यांनी केले. भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महात्े सवानिमित्त महिलास्ं ााठी दश्े ाभक्तीपर गीतगायन स्पर्धा व राष्ट्रनिमार्ण् ा मे स्त्री शक्ती या पस्ु तकाच्या विमोचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
भालचंद्र ब्लड बँकेत रविवारी झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखीलजी पिंगळे उपस्थित होते. मंचावर भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. जयंती आंबेगावकर, सचिव प्रेमा बाहेती यांची उपस्थिती होती.
डॉ. कु कडे काका पुढे बाल्े ाताना म्हणाले की, भारतीय स्त्री शक्ती या संघटनेने वरपासून तळागाळापर्यंत काम केलेले आहे. भावनांचा प्रतिसाद असला की विचारांचे कृतीत रुपांतर होत असते. देशभक्तीपर भावना समाजात प्रसृत करणं हे एक प्रकारचे संस्कार करण्याचे काम आहे. संस्कार म्हणजे विशिष्ट विचारांना प्रवृत्त करणे आणि त्यातून विशिष्ट कृती घडावी यासाठी प्रयत्न करणे होय. देशभक्तीचा व समाजासंबंधीचा आत्मीयताभाव वाढीस लागण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची मदत होते. आपला जुना उत्तम वारसा जागृत करणं, नवीन उपक्रमांची रचना करणं आणि सामाजिकदृष्ट्या समाजजीवन भारुन टाकणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखीलजी पिंगळे म्हणाले, आजची तरुण पिढी ही वेगळ्या चॅनेलवरुन चालत आहे. त्यांच्या चॅनेलवर जाऊन आपल्याला विचार करायला लागेल व त्यांच्यापर्यंत चांगले विचार पाहे चवावे लागतील. आपणच आपल्या मुलांचे आदर्श बनले पाहिज.े समाजात चांगल्या लोकांचे सघ्ं ाटन होणं आवश्यक आहे. व ती काळाचीही गरज आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रनिर्माण में स्त्री शक्ती या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत लातूरातील 14 महिला संघांनी सहभाग नोंदवला. एकाहून एक सरस गाण्यांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. प्रथम पारितोषिक श्री श्री रविशंकर विद्यालय संघाने पटकावले. द्वितीय पारितोषिक ज्ञानप्रकाश संगीत समूहास तर तृतीय पारितोषिक संस्कार भारती संघास मिळाले. केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल संघ, विवेकानंद रुग्णालय संघ व इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन्स विंग यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. संदीप जगदाळे व राधिका पाठक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
भारतीय स्त्री शक्ती लातूर शाखाध्यक्ष डॉ. जयंती आंबेगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. कुमुदिनी भार्गव यांनी राष्ट्रनिर्माण में स्त्री शक्ती या पुस्तकामागची भूमिका विशद केली. सौ. उमा व्यास यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. प्रेमा बाहेती यांनी आभार मानले.
नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !
https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj
No comments:
Post a Comment