घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, ओवैसींची राज ठाकरेंवर टीका
औरंगाबाद : माझे दोन खासदार आहेत. घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलायचे?, या शब्दांमध्ये एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. आज गुरुवारी (ता.१२) औरंगाबाद (Aurangabad) येथे एमआयएमची (MIM) सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार इम्तियाज जलील, माजी आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. कायदा हातात घेण्याची गरज नाही. कोणाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची गरज नाही. आम्ही उत्तर देऊ. कोणताही कुत्रा भोकत असेल तर त्याला भोकू द्या. कुत्र्याचे काम भोकण्याचे आहे. सिंह शांततेत जातो. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. ते जाळ विणत आहे, असे आवाहन ओवैसी यांनी केले. (Akbaruddin Owaisi Attacks On MNS Chief Raj Thackeray In Aurangabad)
मुसलमानांनो तुम्ही गरीब नाही. तुम्हाला चहाविषयी ऐकायचे आहे ना. मी कोणाला उत्तर देण्यासाठी आलो नाही. तुमची लायकी नाही की तुमच्या प्रश्नाला उत्तर मी द्यावे. पुन्हा येईल आमखास मैदानावर, तेव्हा बोलेल. वेळ मी निश्चित करेल, असे सूतोवाच त्यांनी आगामी औरंगाबादेतील सभाबाबत केले.
No comments:
Post a Comment