हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समाजानं बनलाय भारत - अकबरुद्दीन ओवैसी - latur saptrang

Breaking

Sunday, May 15, 2022

हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समाजानं बनलाय भारत - अकबरुद्दीन ओवैसी



 औरंगाबाद : तुमची आणि माझी भेट सात-आठ वर्षानंतर होत आहे. अकबरुद्दीन ओवैसी हा तुम्हाला आणि महाराष्ट्रातील मुस्लिमांना मी कधी बोलवले नाही, असे एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) म्हणाले. तुम्ही सर्वांनी जी साथ दिली ती मी कधीही विसरु शकणार नाही. रमजानचा महिना होता. आणि नांदेडमध्ये रोजा उघडला होता. त्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडला, असे ते म्हणाले. एमआयएमची जाहीर सभा औरंगाबादेत आज गुरुवारी (ता.१२) होत आहे. (MIM Leader Abaruddin Owaisi Public Meeting In Aurangabad)


त्यावेळी ओवैसी बोलत होते. औरंगाबादकरांचे आभार, त्यांनी एमआयएमचा खासदाराला संसदेत पाठवले आहे. शिक्षणात मुस्लिम समाज सर्वात मागे आहे. सच्चर, रहेमान अहवाल असो सर्वात मागासलेले कोण असेल तर तो भारतीय मुसलमान आहे. लोक म्हणतील की अकबरुद्दी ओवैसी मुसलमानांविषयी बोलत आहे. हा मी त्यांच्याविषयी बोलत आहे. मी ताकदवर किंवा कमजोरवाल्यांचे हात पकडू. आमची जबाबदारी आहे, की मागासलेला जो आहे त्यांना ताकद देण्याचे काम मी करतो आहे, असे ओवैसी म्हणाले.


देश हा एकाने बनत नाही. देश बनतो हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन यांच्यामुळे. देशाचा अर्थ काय आहे? हिंदुस्तान हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन यांच्यामुळे बनतो. शाळेच्या कोनशीलामुळे देश बनले. हिंदू, मुस्लिम, जैन सर्व पुढे गेले तरच हा देश महाशक्ती बनेल. केवळ एकाच बळावर महाशक्ती बनेल. ते शक्य नाही, असे ओवैसी म्हणाले.

No comments:

Post a Comment