दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
"मनसेने राजकीय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी"; रोहित पवारांचा टोला
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याप्रकरणी मनसेने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मधे आणलं आहे. अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यासोबतचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो मनसेने शेअर केला आहे. याच प्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेला सुनावलं आहे. (MNS Shared photos of Sharad Pawar with Brijbhushan singh)
रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रोहित पवार म्हणाले, "राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.
🚨 पुण्यातील तरूणाला काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून फडिंग :
पुणे दहशतवादी विरोधी पथकाने दापोली परिसरातून आज एका तरुणाला अटक केली. जुनेद मोहम्मद (वय 18) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे.
🗣️ 'राज्यसभेसाठी दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असतील' :
संभाजीराजे हे स्वतंत्र उमेदवार असून, ते अपक्ष लढणार आहेत, अशी आमच्याकडे माहिती नाही. त्यांच्याकडे 42 मत आहेत, त्यामुळे ते अपक्ष लढू शकतील. मात्र, राज्यसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेच उमेदवार उभे राहतील, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा स्पष्ट केले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
💥 ट्रक-बसच्या भीषण दुर्घटनेत 8 ठार तर 26 जण गंभीर जखमी :
कर्नाटकातील हुबळीच्या हद्दीत आज सकाळी एका प्रवासी बसची एका ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा अपघात हुबळी-धारवाडच्या तरीहाळा बायपासवर घडला. दरम्यान जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
🏥 आरोग्य विभागातील डॉक्टरांची निवृत्ती आता 58 व्या वर्षी :
वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वयाची मर्यादा 58 वरून वाढवून 62 करण्यात आली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता 31 मे 2022 पर्यंत 60 वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसणार आहेत, यात कुठलाही बदल होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले. नव्या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल.
😊 रेस्टॉरंटमध्ये खायला आवडत असेल तर आनंदाची बातमी! :
आता रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर सर्व्हिस चार्ज भरावा लागणार नाही. रेस्टॉरंट यापुढे ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकणार नाहीत. यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाने 2 जून रोजी मोठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत हॉटेल, रेस्टॉरंट, या संबंधित संघटना सहभागी होणार आहेत. या बैठकीत एनआरएआयलाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीत अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
No comments:
Post a Comment