चिकलठाणा सोसायटीत काँग्रेसचे वर्चस्व कायम माजी मंत्री दिलीपराव देशमुखांची नुतन संचालकांची घेतली भेटी - latur saptrang

Breaking

Friday, May 20, 2022

चिकलठाणा सोसायटीत काँग्रेसचे वर्चस्व कायम माजी मंत्री दिलीपराव देशमुखांची नुतन संचालकांची घेतली भेटी



 चिकलठाणा सोसायटीत काँग्रेसचे वर्चस्व कायम

माजी मंत्री दिलीपराव देशमुखांची नुतन संचालकांची घेतली भेटी

लातूर/प्रतिनिधी ः- जिल्ह्यातील विविध गांवामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूका पार पडत आहेत. लातूर तालुक्यातील चिकलठाणा येथे सोसायटीची निवडणूक पार पडली असून या निवडणूकीत काँग्रेसने आपल्या वर्चस्वाची परंपरा कायम ठेवली आहे. या विजयानंतर नुतन संचालकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह पालकमंत्री अमित देशमुख व आ. धिरज देशमुख यांची भेट घेतली. यावेळी नुतन संचालकांनी पक्षश्रेष्ठींचा सत्कार करत त्यांचे आभार व्यक्त केले.
लातूर तालुक्यातील चिकलठाणा हा काँग्रेसचा पारंपारीक गड असून या गावांने नेहमीच काँग्रेसला साथ दिलेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूकीत काँग्रेस प्रणीत पॅनेलने दणदणीत विजय प्राप्त करून आपल्या वर्चस्वाची परंपरा कायम ठेवली आहे. या निवडणूकीत हेमंत जाधव, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवदत्त भारती, बाबासाहेब पाटील, महेश जाधव, नितीन जाधव, शाहुराज भरबडे,  शिदाजी भरबडे, सरस्वती जाधव, लक्ष्मीबाई इंगळे, मोतीराम पांचाळ, व्यंकोबा इंगळे, तुळशीराम कांबळे यांनी विजय प्राप्त केलेला आहे. या विजयामुळे काँग्रेसने आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. चिकलठाणा परिसराती नागरीकांनी नेहमीच काँग्रेसने केलेल्या विकासाच्या राजकारणाला साथ दिलेली असून, विरोधकांच्या भुलथापांना कधीच थारा दिला नसल्याचे सांगत हेमंत जाधव आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवदत्त भारती यांनी सोसायटी मिळालेल्या विजयाचे श्रेय इतरजण घेत असल्याचे स्पष्ट केले. मात्र चिकलठाणा सोसायटीवर काँग्रेसचेच वर्चस्व असून आगामी काळातही काँग्रेसच होणार्‍या प्रत्येक निवडणूकीत विजय मिळवेल असा विश्वास हेमंत जाधव आणि शिवदत्त भारती यांनी व्यक्त केला आहे.
सोसायटी निवडणूकीत विजय प्राप्त केल्यानंतर नुतन संचालकांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, आ. धिरज देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नुतन संचालकांचा सत्कार पक्षश्रेष्ठींनी करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. या निवडणूकीच्या विजयाबद्दल माजी आ. वैजनाथ शिंदे, माजी आ. त्र्यंबक भिसे, बाळासाहेब जाधव, सरपंच बाबुराव इंगळे, शिवाजी जाधव, त्र्यंबकराव इंगळे, श्रीमंत जाधव यांचेही आभार हेमंत जाधव आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवदत्त भारती यांनी मानले आहेत.

No comments:

Post a Comment