दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे.
🚨 केतकी चितळेला 'अॅट्रॉसिटी' कायद्यानुसार अटक
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
💥 चंद्रपूरमध्ये लाकडांनी भरलेला ट्रक आणि पेट्रोल टँकरची धडक :
महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने जाणारा ट्रक आणि पेट्रोल टँकरची एवढी भीषण टक्कर झाली की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ट्रक लाकडांनी भरलेला होता, त्यामुळे आग पसरायला वेळ लागला नाही. ट्रकमध्ये बसलेले 7 आणि पेट्रोल टँकरमध्ये बसलेले 2 जण आगीच्या विळख्यात आले त्यामुळे सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
💐 ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये काळाच्या पडद्याआड :
मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे आणि पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये (वय 71) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही लिमये यांची ख्याती होती. लिमये यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.
🏏 आज राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार लढत :
यंदाच्या आयपीएलमधील आज पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात जागतिक क्रिकेटमधील काही दमदार खेळाडू आमने-सामने असणार आहेत. आजचा हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात असणार असून आजचा विजय राजस्थानसाठी थेट प्लेऑफचं तिकिट असेल. तर चेन्नई हंगामातील अखेरचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
No comments:
Post a Comment