ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा - आ. रमेशआप्पा कराड - latur saptrang

Breaking

Thursday, May 19, 2022

ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा - आ. रमेशआप्पा कराड




 ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा,

 समाजासाठी हिंमत दाखवा - आ. रमेशआप्पा कराड


 


           लातूर दि.१९ - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण महाराष्ट्रात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


             ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे व त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी ही तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू होत नाही असे सांगून आ रमेशआप्पा कराड म्हणाले की दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली व ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवले. मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.


       पुढे बोलताना आ. कराड म्हणाले की, एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली की ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च २०२१ निकालापासूनच स्पष्ट होते. परंतु आता मध्यप्रदेशचा निकाल आल्यावर नवा शोध लागल्यासारखे या सरकारचे मंत्री महाराष्ट्रालाही आपोआप आरक्षण मिळेल अशी दिशाभूल करत आहेत.


             महाविकास आघाडी सरकारने एंपिरिकल डेटा गोळा करण्यात अक्षम्य टाळाटाळ केल्यामुळेच ओबीसींना परत आरक्षण मिळत नाही. या अपयशाची जबाबदारी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचीही आहे. त्यामुळेच त्यांनी आता तरी समाजासाठी हिंमत दाखवावी व मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राने तिहेरी चाचणी पूर्ण करून आरक्षण परत मिळविण्यासाठी मंत्रिपदाचे राजीमाने देऊन सरकारवर दबाव आणावा असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी आवाहन केले आहे.


नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj

No comments:

Post a Comment