समृद्ध शेतकरी अभियान शेतकऱ्यांच्या हिताचे..अरविंद पाटील निलंगेकर - latur saptrang

Breaking

Saturday, May 21, 2022

समृद्ध शेतकरी अभियान शेतकऱ्यांच्या हिताचे..अरविंद पाटील निलंगेकर



समृद्ध शेतकरी अभियान शेतकऱ्यांच्या हिताचे..अरविंद पाटील निलंगेकर 

निलंगा/प्रतिनिधी : 
समृद्ध शेतकरी अभियान हे महाराष्ट्रातील व्यापक अभियान असून शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी अष्टसुञीचा अवलंब करावा असे आव्हान भाजपा प्रदेश सचिव  अरविंद पाटील निलंगेकर यानी केले.
माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून  निलंगा मतदार संघातील निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंञज्ञान व्यवस्थापन यंञणा आत्मा अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण समृद्ध शेतकरी अभियानाची सुरवात तालुक्यातील ननंद येथून  करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक दत्ताञय गवसाने,उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम,कृषी शास्त्रज्ञ अरूण गुट्टे,सरपंच हरीभाऊ बोळे,माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे,माजी जि.प.सदस्य संतोष वाघमारे,चेअरमन दगडू सोळुंके,शेषराव ममाळे,शाहूराज थेटे,रमेश जाधव,गोपाळ नारायणपुरे,व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे निलंगेकर म्हणाले हे अभियान पुढील १० दिवस निलंगा मतदार संघात चालू असून थेट ६० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.शेतकऱ्यांच्या जीवनात सोयाबीन उत्पादकता वाढून आर्थिक  समृद्धी यावी यासाठी आहे.येणाऱ्या काळात सर्वच शेतकऱ्यांनी नवीन तंञज्ञाची शेती अवलंब करणे गरजेचे असून सोयाबीन तूर उत्पादकता वाढवण्यासाठी शेती समृद्ध करणे गरजेचे आहे.तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खते बि-बियाणे पेरतेवेळी कृषी तज्ञाचा सल्ला घेऊन पेरणी करणे अवश्यक आहे.शेतकऱ्यांचे हित व भविष्याचा विचार करूनच आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी गेल्या बावीस वर्षापासून शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम केले आहे.शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने तेवढ्याच उर्जेने काम करावे असा सल्ला शेवटी अरविंद पाटील निलंगेकर यानी दिला.
कृषी शास्त्रज्ञ अरूण  गुट्टे...
लातूर जिल्ह्यात चार लाख साठ हजार हेक्टरवर सोयाबीन पिक घेतले जाते मुग उदिड कापूस यावर फक्त १५ टक्के क्षेञ आहे सोयाबीन क्षेञ वाढवण्यात सध्या वाव नाही परंतु सोयाबीन उत्पादकता वाढवण्यात मोठा वाव आहे.बाहेर देशाच्या सोयाबीन उत्पादकता वाढीचा विचार केला तर आपली उत्पादकता खुप कमी आहे.यावर्षी आपल्या जिल्ह्याची सोयाबीन उत्पादकता प्रती एकर २० क्विंटल पर्यंत कृशी जाईल यासाठी सोयाबीन उत्पादकतेच्या पंचसुञी अवलंब करावा असे आव्हान कृषी शास्त्रज्ञ अरूण गुट्टे यानी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

जिल्हा कृषी अधिक्षक दत्ताञय गवसाने...

सोयाबीन हे जिल्ह्याचे प्रमुख पिक झाले असून लातूर जिल्हा हा राज्यात सोयाबीन उत्पादकतेमध्ये प्रथम आहे.सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी वेगळे करण्याची गरज नाही केवळ साध्या आणि सरळ गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.बियानाची उगवन क्षमता तपासणी करावी रासायनिक आणि जैविक बिज प्रक्रिया कराव्यात बीबीएफ पध्दतीने पेरणी करावी योग्य वेळी फवारणी करावी व रेशीम उद्योग व फळबाग योजनेबरोबर शेतीच्या ३२ योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आव्हान जिल्हा कृषी अधिक्षक दत्ताञय गवसाने यानी केले.


नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj


No comments:

Post a Comment