महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Saturday, May 21, 2022

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

 

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी






  • * पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रूपयांनी स्वस्त होणार, केंद्राचा मोठा निर्णय
    सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रूपयांना स्वस्त होणार असल्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी




  • * खार येथील घराचे बांधकाम अवैध असल्यामुळे मुंबई महापालिकेची राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा नोटीस

    खार येथील घराचे बांधकाम अवैध असल्यामुळे मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. यापूर्वी बजावलेल्या नोटिशीवर राणा दाम्पत्याने आपले म्हणणे पालिकेसमोर मांडले होते. मात्र, ते समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करत पालिकेने पुढील सात दिवसांत अवैध बांधकाम स्वतः हून पाडण्याचे आवाहन राणा दाम्पत्याला केले आहे. अन्यथा पालिका कारवाई करणार असल्याचे नवीन नोटिशीत स्पष्ट केले आहे.
  • * औरंगाबाद ब्रेकिंग : भरदिवसा कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनीचा खून

    औरंगाबादमध्ये भरदिवसा कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनीची भोसकून हत्या. 200 फूट ओढत नेत केली हत्या. एकतर्फी प्रेमातून घडली घटना. बीबीए प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालय जवळ घडली घटना.
  • * इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आरक्षण गेलं नसतं - देवेंद्र फडणवीस

    विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी आरक्षणावरून मविआ सरकारवर निशाणा. ते म्हणाले की, मलिकांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी जेवढा अट्टाहास केला तेवढा अट्टाहास ओबीसी आरक्षणासाठी केला पाहिजे होता. दोन वर्ष इम्पेरिकल डेटासाठी सकारने काही केलं नाही. डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न केले असते तर आरक्षण गेलं नसतं.
  • झाडाची फांदी तोडली म्हणून महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

    महावितरण कर्मचाऱ्याला काठीने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विजेच्या तारांना झाडाची फांदी अडथळा ठरत होती. म्हणून कर्मचाऱ्याने ती फांदी तोडली, याचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने ही मारहाण केली आहे.
  • नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी

    नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी, पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावात पोहोचले सी ई ओ, कुमार आशीर्वाद चक्क अबुजमाडच्या जंगलात
  • मुंबई : 'सामना'तून शिवसेनेनं मांडलेल्या भूमिकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नाराजी. ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार? नाना पटोले यांची शिवसेनेवर टीका.

  • मुख्यमंत्री आणि संजय राऊतांमध्ये अर्ध्या तासापासून बैठक

    मुख्यमंत्री आणि संजय राऊतांमध्ये अर्ध्या तासापासून वर्षा बंगल्यावर बैठक, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून खलबतं
  • शिवसेनेत गेलेले शहाबाज पंजाबी स्वगृही परतणार, राज ठाकरेंच्या उपस्थितीत करणार मनसेत प्रवेश

    पुणे : शिवसेनेत गेलेले शहाबाज पंजाबी स्वगृही परतणार, राज ठाकरेंच्या उपस्थितीत करणार मनसेत प्रवेश
  • अवैध बांधकाम नसल्याचा पुरावा राणांनी द्यावा - किशोरी पेडणेकर

    १५ दिवसांत बांधकाम पाडण्याचा बीएमसीचा राणांना अल्टिमेटम, अवैध बांधकाम नसल्याचा पुरावा राणांनी द्यावा- किशोरी पेडणेकर
  • पुण्यात कोणत्याही नेत्याच्या घरासमोर आंदोलन होणार नाही, पुणे पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय

    पुण्यात कोणत्याही नेत्याच्या घरासमोर आंदोलन होणार नाही, सर्वपक्षीयांच्या बैठकीत निर्णय, पुणे पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय
  • माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश नाही - बृजभुषण सिंह

    राज ठाकरेंविरोधात बृजभुषण सिंह यांची सभा, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश नाही, बृजभुषण सिंहांचा पुनरुच्चार
  • गोंदियात घराशेजारी असलेल्या भामटा निघाला चोर

    घराशेजारी असलेल्या भामटा निघाला चोर, घरातील दार उघडे असल्याची संधी साधून केली सोन्याच्या दागिन्यांची चोरी, तिरोडा पोलिसांनी ३ तासात केली अटक
  • वाढत्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तांनी राजकीय पक्षांची बैठक बोलावली

    यपुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी राजकीय पक्षांची बैठक बोलावली, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेनेचे पदाधिकारी बैठकीला पोहोचले, वाढत्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची बैठक
  • औरंगाबादेत राष्ट्रवादीचे पाण्यासाठी घागर आंदोलन

    औरंगाबाद शहराला सहा ते आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे, यामुळे शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे, या प्रश्नावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुंडलिक नगर भागात घागर आंदोलन करण्यात आले, यावेळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर घागर फोडल्या
  • चंद्रपूर शहराजवळ सिन्हाळा येथील ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    चंद्रपूर शहराजवळ सिन्हाळा येथील ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, दशरथ पेंदोर (६५) असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचं नाव, बकऱ्या चारण्यासाठी गावतलावाशेजारी गेला होता दशरथ, या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिध्द वाघाचा आहे वावर , मात्र वाघावर नजर ठेवूनही अखेर ग्रामस्थाचा गेला जीव
  • लाल महालावर सुरू असलेल्या वादात नृत्यांगना वैष्णवी पाटीलने मागितली जाहीर माफी

    लाल महालात लावणीवर नृत्य केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने कारवाईची मागणी केली होती, यानंतर नृत्यांगना वैष्णवी पाटीलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली
  • लाल महालात नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल

    पुण्यातील लाल महालात नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल, चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील आणि तिचा साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते, वैष्णवीच्या नृत्यानंतर समाज माध्यमातून टीका होत होती, संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी संघटनेने या घटनेविषयी आक्रमक होत आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
  • फुकटात सिगरेट न दिल्याने टपरी चालकावर हल्ला

    फुकटात सिगरेट न दिल्यानं एका टपरी चालकाच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये, हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय
  • बदलापुरात इमारतीच्या पार्किंगमधून २ बाईक चोरीला

    बदलापुरात इमारतीच्या पार्किंगमधून २ बाईक चोरीला, रमेशवाडी परिसरातली घटना सीसीटीव्हीत झाली कैद, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सोसायटीतून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ
  • पर्ल ग्रुपची ७५ एकर आणि ७.५ कोटी जप्त - ईडीची मोठी कारवाई

    पर्ल ग्रुपची ७५ एकर आणि ७.५ कोटी जप्त - ईडीची मोठी कारवाई
  • अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा

    अनैतिक प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, प्रियकराच्या मदतीने झोपेत असलेल्या पतीचा गळा दाबून केला निर्घृणपणे खून, मालेगावच्या टाकळी येथील धक्कादायक घटना, पोलिसांनी अवघ्या काही तासात पत्नी आणि प्रियकराला अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा केला दाखल
  • 'मलिकांचे डी-गँगशी संबंध' मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं कोर्टाचं निरीक्षण 
    नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध होते. नवाब मलिकांनी मनी लाँड्रिंग केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे.
  • जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केले बंद

    परभणीत जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केले बंद, प्रशासनातील सावळा गोंधळ आला चव्हाट्यावर
  • यवतमाळात गारपीटीसह धुवाधार पाऊस, जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

    यवतमाळमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन गारपीटीसह धुवाधार पाऊस झाला, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने अनेकांची दाणादाण उडाली, जिल्ह्यातही काही तालुक्यांना अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा
  • हिंगोलीत शेतकऱ्यांवर काळाचा घाला

    हिंगोलीत शेतकऱ्यांवर काळाचा घाला,शेतातील काम आटोपून घरी येताना रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी आदळून दोघांचा मृत्यु
  • लातूर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

    लातूर शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, थेट गोठ्यावर कोसळली वीज, बनिम, गुळीची केली राख, जनावरांच्या निवाऱ्यासह पोटावरही दिला पाय, मोठी झाडं केली आडवी
  • राणे दाम्पत्याची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमाला भेट

    केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्याच्या पत्नी नीलम राणे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आज कणकवलीतील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेतले, त्यावेळी नारायण राणे व त्याच्या पत्नी भावूक झाल्या
  • नारायण राणे व त्याच्या पत्नी नीलम राणे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने आज कणकवलीतील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट



नवनविन बातम्या व माहितीसाठी आजच लिंक करा !


https://chat.whatsapp.com/JHlG6yiE7GjIe8TfpzZEpj


No comments:

Post a Comment