नवी दिल्ली :PM Kisan Yojana: केंद्र सरकारद्वारे देशात अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा मूळ उद्देश गरजू व गरीबांपर्यंत मदत पोहचवणे आहे. आरोग्य, रोजगार, विमा व आर्थिक लाभ अशा वेगवेगळ्या योजना सरकारद्वारे चालवल्या जातात व या योजनांचा लाभ अनेक लोकांना मिळते. अशीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना खासकरून गरीब शेतकऱ्यांसाठी चालवली जाते व देशातील लाखो लोकांना या योजनेचा फायदा होत आहे. या योजनेंतर्गत काही ठराविक महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारद्वारे २ हजार रुपये जमा केले जातात. तुम्ही देखील या योजनेंतर्गत नोंदणी केली असल्यास तुमच्याही बँक खात्यात थेट रक्कम जमा होईल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे की नाही, हे देखील तुम्ही सोप्या प्रोसेसने जाणून घेऊ शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळतात ६ हजार रुपये
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम २-२ हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
योजनेच्या रक्कमेबाबत असे घ्या जाणून
- तुम्ही जर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केली असेल व तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत पोर्टल https://fw.pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx वर जा.
- वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हाला समोर एक स्क्रीन दिसेल. तुम्हाला येथे महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
- तुम्हाला स्क्रीनवर आधार नंबर, मोबाइल नंबर आणि बँक अकाउंट नंबर दिसेल.
- त्यानंतर तुम्हाला आधार, मोबाइल आणि अकाउंट नंबरपैकी एक पर्याय निवडायचा आहे. या प्रोसेसनंतर तुमच्या समोर सर्व माहिती येईल. यावरून तुमच्या लक्षात येईल की, बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होत आहे की नाही.
No comments:
Post a Comment