😎 एसबीआयच्या ग्राहकांना झटका देणारी बातमी :
जर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तुम्ही कर्ज घेतले असल्यास अथवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) आणखी महागणार आहे. स्टेट बँकेने पुन्हा एकदा MCLR मध्ये वाढ केली आहे. नवीन दर रविवारपासून लागू करण्यात आली आहे. बँकेने दुसऱ्यांदा MCLR मध्ये वाढ केली आहे. या वेळेस बँकेने 10 बेसिस पॉईंटची म्हणजे 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. सर्व कालावधीसाठी घेतलेल्या कर्जांसाठी हा नवीन दर लागू होणार आहे.
💁♂️ कश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी सरकारचं मोठं पाऊल :
सरकारने काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी आता मोठं पाऊल उचललं आहे. काश्मीरमध्ये काम करत असलेल्या हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित जिल्हे आणि तहसील मुख्यालयात काम दिले जाणार असल्याची माहिती उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. तसेच त्यांना पोलिसांची सुरक्षा देखील पोहोचवणार आहेत. पंतप्रधान मदत पॅकेज अंतर्गत नियुक्त केलेल्या जवानांच्या कल्याण आणि सुरक्षेशी संबंधित सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडवल्या जातील.
🎯 अदानींची सिमेंट उद्योगात भक्कम 'पायाभरणी' :
अदानी समूहाने होल्सीम ग्रुपच्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शेअर बाजार सिमेंट कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळण दिसून आली आहे. अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंटच्या दरात मोठी तेजी आली आहे. अदानी समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंट कंपनी 10.5 अब्ज डॉलर म्हणजे 82 हजार कोटी रुपयांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात उसळण दिसून येत आहे.
🌧️ राज्यातील 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता :
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना आणि परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे रोजीपर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.
🏏 आज दिल्ली विरुद्ध पंजाब लढत; पराभव झाल्यास स्पर्धेबाहेर! :
आयपीएल 2022मध्ये आज 64वी लढत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ही लढत दोन्ही संघासाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पंजाब आणि दिल्लीला जर प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर आजची लढत कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ 29 वेळा भिडले आहेत. त्यापैकी 15 वेळा दिल्लीने तर 14a वेळा पंजाबने बाजी मारली आहे.
No comments:
Post a Comment