मुंबई, दि. २३ : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल. अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील. अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी. ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर २०१८ नुसार हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे दि.२३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.
योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे. विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Haqg5Ee
https://ift.tt/b1OvXYT
No comments:
Post a Comment