निलंगा तालुक्यातील विषबाधा घटनेची... - latur saptrang

Breaking

Monday, May 23, 2022

निलंगा तालुक्यातील विषबाधा घटनेची...



 निलंगा तालुक्यातील विषबाधा घटनेची

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून दखल

जिल्हाधिकारी व आरोग्य प्रशासनाला चौकशीचे निर्देश

तातडीने उपचार करण्याच्या आरोग्य यंत्रणेला सुचना

 

लातूर  प्रतिनिधी : दि.२३ मे २०२२ :

  लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे लग्नसोहळयात २०० हून अधिक वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समजताच सदरील घटनेची माहिती घेऊन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी, आरोग्य प्रशासन व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांना तातडीने भेट देऊन घटनेची चौकशी करावी, संबंधितावर तातडीने उपचार करावेत व या संदर्भातील सवीस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

  निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे २२ मे रोजी दुपारी लग्न लग्नसोहळा पार पडला. विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या २०० हून अधिक वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी घटनेची माहिती घेतली. या सर्वावर देवणी तालुक्यातील वलांडी येथे प्रा. आरोग्य केंद्र, निलंगा उपजिल्हा रूग्णालय, जवळगा उपकेंद्र, अंबुलगा बु. या ठिाकणी उपचार सुरू आहेत या बाबतची सविस्तर माहिती घेतली.

  या संदर्भाने जिल्हाधिकारी, लातूर, आरोग्य शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय सांळुके, जिल्हा परीषद, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, लातूर यांनी भेट देऊन  या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करावा, सर्व विषबांधीत रुग्णावर आवश्यक उपचार तातडीने करावेत अशा सुचना त्यांनी केल्या.

No comments:

Post a Comment