दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
❗ 'मंकीपॉक्स'ची दहशत, केंद्र सरकारकडून राज्यांना अलर्ट :
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. WHOच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य जुनोटिक रोग आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. सध्या भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, मात्र इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचनेनंतर महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे.
👀 औरंगाबाद दाम्पत्याची निर्घृण हत्या...
औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री आणि किरण शामसुंदर कळंत्री, असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोन दिवसांहून अधिक वेळ मृतदेह घरात पडून असल्याने आज परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
💁♂️ आता राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई होणार! :
राज्यातील 674 शाळा अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित शाळा सुरू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नियमानुसार अनधिकृत शाळांना एक लाख रुपये दंड आणि शाळा बंद करण्याच्या सूचना देऊनही शाळा सुरू राहिल्यास प्रति दिन दहा हजार रुपये दंड ठोठावण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
😎 ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन 'मविआ'मध्ये वादाची ठिणगी! :
मध्य प्रदेशनं ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून दाखवलं तर महाराष्ट्राची गाडी अहवालावरच अडकून पडली आहे. विरोधकांनी याच मुद्यावरुन सरकारला घेरलं असताना आता मविआचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसनेच सरकारला इशारा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेसच्या ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.
🗣️ कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती :
आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरोनाचा आकडा फार नाही. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झालंय. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment