मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा ( इज्तेमाई शादियाँ ) - latur saptrang

Breaking

Monday, May 23, 2022

 मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा ( इज्तेमाई शादियाँ )





यूसुफ पठान


 महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून  गेल्या 19 वर्षापुर्वी सिल्लोड येथे सुरु करण्यात आलेल्या मुस्लिम सामूहिक विवाह सोहळा ( इज्तेमाई शादियाँ ) सालाबादाप्रमाणे याही वर्षी घेण्यात आला. 101 जणांचा निकाह या सामूहिक विवाह सोहळ्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अक्कलकुवा येथील मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी होते. तर  नवदांपत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी  महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, उपनगराध्यक्ष तथा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव अब्दुल समीर, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ. मॅचिंद्र पाखरे, सलीममियॉ मदरसा चे मौलाना मूसा साहब वस्तानवी, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे,आदींची  उपस्थिती होती.


उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवार ( दि.22 ) रोजी सिल्लोड शहरातील जमालशाह  कॉलनी भागातील नॅशनल उर्दू हायस्कूलच्या मैदानात हा सोहळा संपन्न झाला.

-----------------------------------------------

      या सोहळ्यात निकाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आयोजकांच्या वतीने कपाट, गादी, पलंग तसेच संसार उपयोगी साहित्य, वर - वधू यांना कपडे, वधूसाठी मणी मंगळसूत्र व आलेल्या पाहुण्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

-----------------------------------------------

        आज समाजामध्ये लग्ना सारख्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे. लग्नावरील नाहक होणार खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करीत नॅशनल एज्युकेशन सोसायटी व मित्र मंडळाने इज्तेमाई शादियाँची परंपरा कायम ठेवून समाजपुढे एक आदर्श  ठेवला असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

                       हिंदू समाजासाठी देखील सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा माझा अनेक दिवसाचा मानस आहे. हिंदू बांधवानी पुढाकार घेतला तर येणाऱ्या वर्षी श्री. मुर्डेश्वर संस्थान येथे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून यासाठी सर्वोतोपरी मदत करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

-----------------------------------------------

       यावेळी मौलाना वस्तानवी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुराण मानवता धर्म शिकवतो त्यामुळे आपल्या पाल्याना कुराण पठण करायचे शिकवा, आई वडिलांचा आदर करा, शिक्षण हे एक पावर असून मुस्लिम समाजाने कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आपल्या पाल्याना उच्च शिक्षण द्या असे आवाहन मौलाना गुलाम वास्तनवी यांनी यावेळी केले.


यावेळी नगरसेवक विठ्ठल सपकाळ, रुउफ बागवान, सुधाकर पाटील , बेग चांद मिर्झा, शंकरराव खांडवे, शेख सत्तार हुसेन, आसिफ बागवान, सुनील दुधे, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन ,शेख बाबर, राजु गौर, जुम्मा खा पठाण, मतीन देशमुख, मनोज झंवर, अकिल वसईकर , जितु आरके, अनिस कुरेशी ,  मोईन पठाण , शेख मोहसिन, रईस मुजावर, बबलू पठाण आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान, मोईन पठाण, हाजी शेख अय्युब, हाजी मोहमद हनिफ, मुश्ताक देशमुख, शेख वसीम,  शेख अजीम, अबरार देशमुख, हकीम पठाण आदींसह नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी व राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment