दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
😊 सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार
देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. कारण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने एक सूचना जारी केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, देशात काम करण्यासाठी लोकांची वयोमर्यादा वाढवावी. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात निवृत्तीचे वय वाढवण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. त्यासाठी समितीने आपला प्रस्तावही पाठवला आहे.
🌊 आसाममध्ये हाहाकार! दोन हजाराहून अधिक गावं पाण्याखाली
आसाममध्ये पुराने हाहाकार घातला आहे. पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. 31 जिल्ह्यातील जवळपास 6.80 लाख लोकांना या महापुराचा तडाखा बसला आहे. 93 हजार 562.40 हेक्टर पीक जमीन आणि 2 हजार 248 गावे अजूनही पाण्याखाली आहेत.
👨⚕ डॉक्टर, आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सर्व डेटा एका क्लिकवर मिळणार
देशातील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि फार्मासिस्ट यांची संपूर्ण माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. हेल्थ प्रोफेशनल्स रजिस्टरद्वारे (HPR) हे शक्य होणार आहे. प्रत्येक शहर किंवा परिसरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांची माहिती या डॅशबोर्डवर असेल.
😎 हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ‘दिशा बलात्कार व हत्या’ प्रकरणातील आराेपींचे एन्काउंटर बनावट असल्याचे याप्रकरणी स्थापन केलेल्या न्यायालयीन चाैकशी आयाेगाने म्हटले आहे. आराेपींचा मृत्यू व्हावा, या हेतूनेच गाेळीबार करण्यात आल्याचा ठपका आयाेगाने पाेलिसांवर ठेवला आहे. याप्रकरणी दहा पाेलिसांवर हत्येप्रकरणी खटला चालविण्यात यावा, अशी शिफारसही आयाेगाने केली आहे.
📍 संजय राऊत पुन्हा राज्यसभेवर, 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज
राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत. शिवसेनेनं देखील हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यसभेसाठी संजय राऊत 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम राऊत प्रस्थापित करणार आहे.
No comments:
Post a Comment