लातूर: आम आदमी पक्षाने लातूर महानगरपालिका निवडणूक लढवण्याची भूमिका घेत पक्ष वाढीस सुरुवात केली आहे.या निमित्ताने सतीश करंडे यांची लातूर म.न.पा झोन प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील निवड आम आदमी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार केली आहे. लातूर शहरातील सामाजिक कार्य तथा जनतेच्या विविध प्रश्नांसाठी प्रशासनाविरोधात केलेले आंदोलने, निवेदने याची दखल घेऊन थेट झोन प्रमुख पदी सतीश कारंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सामाजिक क्षेत्रातील युवकांना संधी देण्यासाठी ही नियुक्ती करून पक्षाने पहिले पाऊल उचलले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व येणाऱ्या मनपा निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्या युवकांनी जन विकासाच्या मोहिमेसाठी पक्षात सामील व्हावे असे आव्हान पक्ष पदाधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष अमित पांडे,व्यवस्थापक व प्रचार प्रमुख शाम माने, मनपा झोन प्रमुख सतीश करंडे, सचिव सुमित दीक्षित, उपाध्यक्ष सचिन औरंगे, युवा शहराध्यक्ष कुमार खोत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment