MNS Loudspeaker Row : वसंत मोरे नॉट रिचेबल, भोंगा आंदोलनात सहभाग नाही
सुरु करण्यात आलं आहे. काही ठिकाणी पहाटेच्या अजाणवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. परंतु आज मनसेकडून राज्यात सर्वत्र मशिदींसमोर भोंगे लावण्यात येत असताना पक्षाचे नेते वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाही. उलट कालपासून ते नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे वसंत मोरे नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर उमटला तो त्यांच्याच पक्षातील वसंत मोरे यांच्या रुपात. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय यानंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. पण आजच्या भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नाहीत. कालपासून ते नॉट रिचेबल आहेत.
No comments:
Post a Comment