दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
💁♂️ आयटीआय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!
शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत 3 मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून 10वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
😊 आता मुंबई-पुणे प्रवास अडीच तासात होणार पूर्ण! :
लवकरच महाराष्ट्राला पहिली 'वंदे भारत' ट्रेन मिळणार आहे. याद्वारे आपल्याला मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त अडीच तासात करता येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत वंदे भारत ट्रेन मुंबई पुणे यादरम्यान धावणार असल्याची माहिती आहे. सध्या उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई ते पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. मात्र वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
💐 'प्रवीण मसालेवाले'चे निर्माते चोरडिया यांचं निधन :
पुण्यातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. प्रवीण मसालेवाले या सुप्रसिद्ध ब्रँडचे ते संस्थापक होते. 1962 मध्ये त्यांनी प्रवीण मसालेवाले या कंपनीची स्थापना केली. आपलं भोजनाचं ताट स्वादिष्ट करणारं अत्यंत विश्वासार्ह नाव म्हणून प्रवीण मसालेवाले या मसाला कंपनीची ओळख आहे.
😎 खाद्यतेलांच्या मागणीत झाली घट...! :
सोयाबीन, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क माफीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी खाद्यतेल बाजारात एकंदर मंदीसदृश वातावरण आहे. गावोगावच्या यात्रांचा हंगाम संपत आला आहे. तसेच आगामी काळात महत्त्वाचे सण नसल्याने खाद्यतेलांच्या मागणीत घट झाल्याचे निरीक्षण खाद्यतेल व्यापाऱ्यांनी नोंदविले. शेंगदाणा तेल वगळता सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेलाच्या पंधरा किलोच्या डब्यामागे 100 ते 200 रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारातही या तेलांचे दर प्रतिकिलोमागे तीन ते चार रुपयांनी घटले आहेत.
🎯 ईडीकडून राहुल गांधींना नव्याने समन्स :
नॅशनल हेराल्ड प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नव्याने समन्स बजावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना 13-14 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, काँग्रेसने गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment