दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Monday, June 13, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



📉 एलआयसीच्या शेअर 700 रुपयांखाली घसरला :


एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. एलआयसीच्या शेअर दराने आत्तापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. एलआयसीच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून 700 रुपयांखाली शेअर दर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 260 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 


📍 पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे एकाच मंचावर दिसणार :


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. 


💁‍♂️ विधानपरिषद निवडणुक : महाविकास आघाडीची धाकधूक वाढली :


महाराष्ट्रातील दहा विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. दहा जागांसाठी 12 अर्ज दाखल आहेत. महाविकासच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपच्यावतीने पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत. सध्याची महाविकासआघाडीतील पक्ष्यांची संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी दोन आमदार जिंकून येत आहेत मात्र काँग्रेसला दुसऱ्या उमेदवारासाठी अधिक मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.


🚨 संतापजनक! बस चालकाचा प्रवासी महिलेवर बलात्कार :


पुण्यात एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही महिला बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी आलेल्या या दाम्पत्याला आरोपीने ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. सदर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


👀 ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरला अटक :

 

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली आहे.  ड्रग्ज प्रकरणात सिद्धांत कपूरला अटक करण्यात आली. बंगळुरु पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली. मेडिकल टेस्टमध्ये सिद्धांत कपूरनं ड्रग्ज घेतल्याचं उघड झालं आहे.  सिद्धांत कपूरला बंगळुरुच्या उलसुरु पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलंय.  


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment