अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे - latur saptrang

Breaking

Tuesday, June 21, 2022

अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 21 : ‘अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी. त्यासाठी जाणिव जागृती करायला हवी’, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.

दोस्त फाऊंडेशनच्यावतीने आयोजित अवयवदान दिंडी व चित्ररथास श्री. टोपे यांनी ध्वज दाखवून प्रारंभ केला. यावेळी दोस्त फाऊंडेशनचे डॉ. कैलास जवादे, डॉ. वैशाली जवादे, डॉ. गोविंद जवादे, डॉ. स्वाती माने, विजय कोहड आदी उपस्थित होते.

श्री. टोपे यांनी सांगितले की, आपल्या देशात अनेक नागरिकांना प्रत्यारोपणासाठी विविध अवयवांची आवश्यकता असते, मात्र त्या प्रमाणात अवयव उपलब्ध होत नाहीत. अनेक नागरिकांना अवयव मिळत नाहीत. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दोस्त फाऊंडेशनच्या वतीने केली जाणारी जाणीव जागृती महत्त्वाची आहे.

अवयवदानाबाबत माहिती देणारा चित्ररथ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्यामाध्यमातून अवयवदानाबाबत असणारे गैरसमज दूर करणे, समाजात सकारात्मक विचार रुजवणे हे काम केले जाणार आहे, असे डॉ. जवादे यांनी सांगितले.

                                                                        000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/JD8LcC7
https://ift.tt/FuRpQ2t

No comments:

Post a Comment