मुंबई, दि.21: योग म्हणजे केवळ शारीरिक आसने नाही तर योग म्हणजे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य देणारी परिपूर्ण जीवन पद्धती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. राजभवनाच्या दरबार हॉल येथे आयोजित योग दिन कार्यक्रमाला 30 देशांचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या शिष्यवृत्तीवर भारतात शिक्षण घेत असलेले विविध देशांचे विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांनी विविध देशांच्या वाणिज्यदूतांशी संवाद साधला तसेच उपस्थित मार्गदर्शकांचा सत्कार केला.
यावेळी फिटनेस गुरु मिकी मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली. विभागीय पारपत्र अधिकारी राजेश गवांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी वास्तुरचनाकार अनुजा सावंत यांचे ‘वास्तू शास्त्र’ या विषयावर, डॉ श्वेता भाटिया यांचे ‘आहारातील मेद’ या विषयावर तसेच त्वचा विशेषज्ञ डॉ. श्रुती बर्डे यांचे ‘नैसर्गिक त्वचेसाठी गुंतवणूक’ या विषयावर भाषण झाले. संगीत जुगलबंदीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला आयसीसीआरच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी देखील उपस्थित होत्या.
राजभवन कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग
यावेळी ‘द योग इन्स्टिट्यूट’च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगासने केली.
000
Maharashtra Governor joins diplomats, international
students in celebrating Yoga Day at Raj Bhavan
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari joined members of the diplomatic community of Mumbai and international students in celebrating the International Day of Yoga at Raj Bhavan Mumbai on Tue (21 June).
Members of the diplomatic community, trade representatives from various countries and foreign students studying in India under ICCR scholarships were present.
The International Yoga Day was organized by Videsh Bhavan, the Regional Office of Ministry of External Affairs.
Interacting with diplomats and students, the Governor said Yoga is not just physical exercises, but it is a comprehensive way of life involving physical, mental and emotional well being.
The international delegates participated in a yoga session conducted under the guidance of fitness guru Mickey Mehta. Regional Passport Officer Rajesh Gawande welcomed the guests. Regional Director of Indian Council of Cultural Relations Renu Prithiani was also present.
The Governor felicitated the speakers and trainers on the occasion.
Raj Bhavan officers and staff also participated in a yoga session conducted by The Yoga Institute.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/bWlM6RL
https://ift.tt/eZBQuNn
No comments:
Post a Comment